शिवस्मारकाचे उद्घाटन होणार

jalgaon-digital
2 Min Read

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण (kalwan) शहरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे (Shivaji Maharaj Memorial) काम युद्धपातळीवर सुरु असून अंतिम टप्प्यात आले आहे.

कळवण तालुका (kalwan taluka) छत्रपती स्मारक समितीच्या शिष्टमंडळाने आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP National President MP Sharad Pawar) यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत आश्वासित केले.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच 21 फूट पुतळ्याची उंची, 17 फूट पुतळ्याची लांबी आणि 7 टन वजन असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा तयार करण्याचे काम दिल्ली येथे विश्वविख्यात शिल्पकार, पद्मश्री राम सुतार यांच्या स्टुडिओत सुरु असून काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमदार नितीन पवार व कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवस्मारक स्थळावर कळवण तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच भगवा ध्वज 171 फूट उंचीवर फडकविण्यात आला असल्याचे खासदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रमापासून सध्या सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुरु असलेल्या कामाची चित्रफीत खासदार पवार यांना यावेळी दाखविण्यात आली.

लोकवर्गणीतून उभारणार्‍या शिवस्मारकाला जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध संस्था, संघटनांसह शिवप्रेमींकडून स्वयंस्फूर्तीने वर्गणी उभी राहत आहे. 3 कोटी 50 लाख रुपये खर्च शिवस्मारकाचा अपेक्षित असल्याची माहिती देऊन शासनस्तरावरील सर्व शासकीय परवानग्या घेऊन कामकाज सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शरद पवार यांनी स्मारक समितीच्या कामकाजाचे यावेळी कौतुक करुन उपस्थित राहण्याबाबत आश्वासित केले. यावेळी समितीचे सदस्य सुधाकर खैरनार, हरीश जाधव, नाना पवार आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *