Wednesday, April 24, 2024
Homeधुळेरस्त्यांवर जीवघेणे खड्डे : शिवसेनेचा रास्ता रोको

रस्त्यांवर जीवघेणे खड्डे : शिवसेनेचा रास्ता रोको

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

पहिल्याच पावसात रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यांवर चालणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरीत दुरुस्त करावे. यासाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली.

- Advertisement -

रास्तारोको आंदोलनात जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, पश्चिम महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, डॉ. सुशील महाजन, युवासेनेचे पंकज गोरे, संदीप सूर्यवंशी, माजी नगरसेवक गुलाब माळी, पुरुषोत्तम जाधव, देविदास लोणारी, शेखर वाघ, सुनील आगलावे, दिनेश पाटील, ललित माळी, भटू गवळी, सचिन बडगुजर, शुभम मतकर, पंकज भारस्कर, संदीप चौधरी, रामदास कानकाटे, संजय वाल्हे, सुनील आगलावे, दिनेश पाटील, एजाज शेख आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी रास्तारोको करणार्‍या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांच्या सुटका केली.

निवेदनात म्हटले आहे की, पहिल्याच पावसात मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपचा विकास खड्ड्यात गेला. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धुळे महानगर हद्दीतील देवूपर भाग हा पूर्णपणे खड्ड्यात सापडलेला आहे.

सर्व प्रमुख रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. रोज छोटेमोठे अपघात होतात. पण मनपाचे प्रशासन काहीही करीत नाही. भाजपच्या सत्ताधार्‍यांना जनतेचे सोयरसुतक नाही. खोटे बिल काढणे व केलेल्या कामांचे बिल काढणे, फुगीर इस्टीमेंट तयार करून करोडो रूपयांचे टेंडर काढून त्यांच्या मर्जितील ठेकेदारांना टेंडर मॅनेज करून देणे आणि यांची ही साखळी तोडून कोणी ऑनलाईन टेंडर भरलेच तर मनपाच्या पदाधिकार्‍यांचा दालनात त्या ठेकेदारांना बोलावणे. अधिकार्‍यांच्या समक्ष दमदाटी करणे किंवा प्रसंगी मारहाण करून टेंडर प्रक्रियेतून त्या ठेकेदारास स्वतःहून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले जाते. असे निवेदनात म्हटले आहे.

रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांसाठी तात्काळ टेंडर काढावे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेणे खड्डे बुजवण्यास सुरुवात करावी, कारण दोन दिवसांपूर्वी सावरकर पुतळ्याकडून अंडाकृती बगीचापर्यंत असलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होणार होता.

परंतू प्रसंगावधान राखून एस.टी. चालकाने एका तरुणीचा जीव वाचविला. त्यामुळे शहरातील असे अपघातास नियंत्रण देणारे खड्डे तात्काळ दुरुस्त करावे. एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने खड्डे दुरुस्तीसाठी आंदोलन केले जाईल. असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या