Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी साधला संवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी साधला संवाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

.शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackery Jayanti यांच्या जयंती निमित्त राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला . यावेळी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.

- Advertisement -

तळागाळातल्यांना बाळासाहेबांनी संधी दिली बाळासाहेबांनी स्वतः कधीही पद घेतलं नाही शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नाही. बाळासाहेबांना देश विसरणार नाही

– मंत्री सुभाष देसाई

आज बाळासाहेब असते तर 96 वर्षाचे असते. बाळासाहेबांनी तरुणांचे नेतृत्व केलं. आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला भेटण्यासाठी येणारा, शिवसेनेबाबत आस्थेने विचारणारा वर्ग तरुण आहे. बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढं नेलं.

– खा. संजय राऊत

आपल्या कडे भगव्याची लाट का येऊ शकत नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच दिल्लीत सत्ता मिळविण्याच स्वप्न पूर्ण करू , एकट्यान लढण्याची तयारी आहे, जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावान आहेत. शिवसैनिकांच्याच जोरावर आपण पुढे जाणार आहोत. काळजी वाहू विरोधकांनी माझ्या तब्येतीची काळजी करू नये.वाघ असाल तर वाघासारखे जिद्दीने लढा. या पुढे प्रत्येक निवडणूक जिंकायचीच अशा जिद्दीने लढा . शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजपण त्यांच्या विचारांनी आपल्या मध्ये आहेत. शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या भगव्याच मोल कमी होऊ देऊ नका, राज्यात शिवसेनेची लाट आणायची आहे असे ही शिवसेना प्रमुखांनी संवाद साधताना आवाहन केले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisment -

ताज्या बातम्या