Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डीत करोना संसर्ग वाढू नये म्हणून जनजागृती- नगराध्यक्ष

शिर्डीत करोना संसर्ग वाढू नये म्हणून जनजागृती- नगराध्यक्ष

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डी शहरात जगभरातून भाविक येत असतात. त्यामुळे सध्या राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता

- Advertisement -

साईबाबांच्या नगरीत करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी काल सकाळी शहरातून जनजागृती करत नागरिकांना तसेच भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले असून नगरपंचायतीच्यावतीने मास्क वाटप करण्यात आले. दरम्यान मास्क न वापरणार्‍यांंवर एक हजार रुपये तसेच रस्त्यावर थुंकणार्‍यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री. गोंदकर यांनी दिली.

राज्यात करोनाची दुसरी लाट उसळली असून त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात रेड अलर्ट करण्यात आला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढती संख्या राज्य शासनापुढे आवाहन असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शिर्डी नगरपंचायतमध्ये पदाधिकारी व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत आढावा तसेच मार्गदर्शक सुचनांबाबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, अ‍ॅड अनिल शेजवळ, रवींद्र गोंदकर, मुख्य लिपिक मुरलीधर देसले, रावसाहेब म्हस्के, श्री. लासुरे, श्री. भोसले, श्री. पोटे आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार शिर्डी शहरात सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, मंगल कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही, जनजागृती, आठवडे बाजारात दवंडी, डॉक्टर, मेडिकल व्यावसायिक, शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, रिक्षा चालक, साई संस्थानचे अधिकारी आदींबाबत चर्चासत्र झाले.

यावेळी नगराध्यक्ष श्री. गोंदकर यांनी उपस्थित नगरसेवक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शक सुचनांचे स्वागत करून याविषयी तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले. शहरात विनामास्क फिरणार्‍यांंवर एक हजार रुपये तसेच रस्त्यावर थुंकणार्‍यांंवर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याने शिर्डी तसेच परिसरातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शहरातील उपनगरात सोडीयम हायपोक्लोराईड फवारणी तातडीने करावी, असेही आदेश आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या