Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीस सुरुवात

शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीस सुरुवात

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक सेवेस गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी संगमनेर येथील

- Advertisement -

एका अ‍ॅग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून 400 किलोचा माल दिल्लीस रवाना करण्यात आला आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

मालवाहतूक सेवेची सुरुवात अधिकार्‍यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आली. यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, औद्योगिक सुरक्षा बलचे उपकमांडंट दिनेश दहिवडकर, स्पाईसजेट एअर लाईनचे व्यवस्थापक प्रभाकर राजन तसेच प्रभाकर डेअरीचे सारंगधर निर्मळ आदी उपस्थित होते.

यावेळेस पहिल्यांदाच मालवाहतूक करणारे सर्व्हिसेसचे मालक सागर भोंगळे यांचे शिर्डी विमानतळ प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो कार्यालयाकडून शिर्डी विमानतळास प्रवासी वाहतुकीसोबत कार्गो वाहतुकीसाठी 19 मार्चला मान्यता मिळाली. प्रत्यक्ष मालवाहतुकीस सुरुवात आज झाली. मालवाहतूक सुरू झाल्याचा फायदा स्थानिक माल वाहतुकीस मिळेल.

भारतातील विविध शहरांमध्ये उड्डाणाद्वारे मालवाहतूक करण्यात मदत होईल परिणामी रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हवाई वाहतुकीमुळे वेळेची बचत होईल. सध्या प्रवाशी वाहतूक करणार्‍या विमानामधूनच मालवाहतूक होणार आहे. यास कसा प्रतिसाद मिळतो यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पहिल्याच दिवशी चारशे किलो मालाची वाहतूक सुरू झाल्याने याठिकाणी मालवाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या