Thursday, April 25, 2024
Homeनगरशेवगाव : भाविनिमगाव जगदंबा माता मंदिर खुले

शेवगाव : भाविनिमगाव जगदंबा माता मंदिर खुले

बक्तरपुर | वार्ताहर

करोना महामारीच्या काळात सात महिने चोविस दिवसाच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर देवालये दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागरीकांना देव दर्शनासाठी खुले करण्यात आले असून करोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविण्याच्या सुचना शासकीय स्तरावरून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत मुखदर्शनावर समाधान मानावे लागणा-या भाविकांमधुन मंदिर खुले करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. विविध धार्मिक ठिकाणी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागरीकांच्या उपस्थितीत देवस्थान विश्वस्त, पुजारी यांनी विधिवत पुजा करून मंदिर खुले झाल्याचा आनंद व्यक्त केला. शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील जगदंबा माता मंदिर पाडव्याच्या दिवशी सकाळी मुख्य प्रवेशद्वार नागरीकांना देव दर्शन घेण्यासाठी उघडण्यात आले.

सेवा सोसायटी चेअरमन मिलींद कुलकर्णी व भजनी मंडळाचे मार्गदर्शक ह.भ.प दत्तात्रय काळे यांच्या हस्ते जगदंबा मातेस पुष्पहार अर्पण करून करोना मुक्तीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष भारत गायधने, पोपट शेळके, सरपंच पांडुरंग मरकड, अजय कुलकर्णी, मच्छिंद्र जरे, डॉ.शंकरराव जाधव, नामदेव चव्हाण, सावता चेडे, बाबासाहेब जरे,सिताराम चेडे, पुजारी शाहुराव गायकवाड, अशोक गायकवाड, आदींसह गावातील नागरिकांनी पाडवा मुहूर्तावर दर्शनाचा लाभ घेतला.

भाविकांनी करोनाचे नियम पाळावा

ज्या महामारीच्या कोपाने ऐतिहासिक परीस्थिती निर्माण होऊन तारणहार असलेल्या देवालयासही दार बंद करण्याची वेळ आली याची जाणीव ठेवून गावातील नागरीकांनी दररोज दर्शन घेण्यासाठी गर्दी करू नये व करोना खबरदारी चे सर्व प्रकारच्या सुचना प्रतिबंधक उपाययोजना करण्यास हलगर्जीपणा वा टाळाटाळ करू नये, कारण आपल्या ला करोना संक्रमण वाढवण्यासाठी नाही तर करोना मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तरी देवस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायत यांनी केलेल्या सुचनाचे पालन करून करोनामुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन सरपंच पांडुरंग मरकड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या