‘तो’ व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी साधला पंतप्रधानांवर निशाना

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. भारतीय जवानांचा ट्रकमधून जातानाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लष्कराच्या जवानासोबत केला जाणारा दुजाभाव समोर आणला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी विचारलं की पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपये खर्च करीत आलिशान फ्लाइट मागवलं आणि सैनिकांना विना बुलेट प्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवलं. त्यांनी ट्विट केलं आहे की, आमच्या जवानांना नॉन-बुलेट प्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 8400 कोटींचं विमान. हा न्याय आहे का?

आज पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रकमध्ये जवान बसले आहेत जे एकमेकांसोबत बोलत आहेत. त्यापैकी एक जवान म्हणतो की, नॉन बुलेट प्रुफ गाडींमध्ये पाठवून आमच्या जीवासोबत खेळलं जात आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात पंजाबच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी आरोप केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशविरोधी नीती आणि कारवायांमुळे देश कमकुवत झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *