Friday, April 26, 2024
Homeनगरमाहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग; तरुणाविरूद्ध गुन्हा

माहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग; तरुणाविरूद्ध गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)

माहेरी आलेल्या विवाहितेसोबत घरात घुसून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाळासाहेब नामदेव वाबळे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. नगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली.

पीडित महिला दिवाळीनिमित तिच्या माहेरी आली होती. २५ नोव्हेंबर रोजी पीडित महिला घरी असताना बाळासाहेब वाबळे तिथे आला. त्याने पीडितेला जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडिता त्याला विरोध करत असताना तिच्या गळ्यातील गंठण तुटून गहाळ झाले आहे.

याच दरम्यान, पीडितेचा पती त्याठिकाणी आला असता वाबळेने त्यालाही शिवीगाळ करत तुम्ही कुठे जाताय, असे म्हणत तलवारीने कापण्याची धमकी दिली. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या