Friday, April 26, 2024
Homeनाशिकसात एकरात फुलविली डाळिंबाची बाग; पाहा व्हिडीओ

सात एकरात फुलविली डाळिंबाची बाग; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

गेल्या काही वर्षांपासून डाळिंब शेतीला (Pomegranate Farming) तेल्या आणि मर रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) या समस्येमुळे आपली डाळिंबाची बाग काढून नवा पर्याय निवडला आहे. मात्र, असेही काही शेतकरी आहेत की त्यांनी आपल्या डाळिंब शेतीतील कोणत्याही संकटासमोर हात न टेकता हार मानली नाही…

- Advertisement -

मालेगाव तालुक्यातील (Malegaon taluka) दाभाडी (Dabhadi) या गावातील शेतकरी अण्णासाहेब देवरे यांनी आपल्या सात एकर शेतीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून डाळिंबाची शेती अतिशय यशस्वीपणे फुलविली आहे. या सात एकरमध्ये त्यांनी दोन हजारांच्यावर डाळिंबाची झाडे लावली आहेत.

तसेच योग्य नियोजन आणि अचूक व्यवस्थापन परिस्थितीच्या अभ्यासातून देवरे यांनी आपले डाळिंब शिवार अत्यंत किफायतशीर ठरविले आहे. देवरेंच्या शेतीविषयक (Agricultural) सकारात्मक दृष्टीकोनाची शासनाने दखल घेत त्यांना ‘कृषिभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अण्णासाहेब देवरेंचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या