Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याखादी खरेदीचा नवा विक्रम रचा

खादी खरेदीचा नवा विक्रम रचा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

पुढील आठवड्यात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती Mahatma Gandhi Jayanti साजरी होणार आहे. या दिवशी खादी खरेदी Buy khadi करून आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modiयांनी देशवासियांना केले.

- Advertisement -

अमेरिका दौर्‍यावरून परतलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. त्यांच्या कार्यक्रमाचा 81 वा भाग होता. पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘जागतिक नदीदिना’चे महत्त्व सांगून केली.

मानवी जीवनातील नद्यांचे महत्त्वही त्यांनी विशद केले. नदीला आपण माता म्हणतो. तिचे गुणगाण गातो. तरीही नद्या प्रदूषित का होतात? असा प्रश्न तुम्हाला कोणीही विचारेल. नद्यांमध्ये थोडे जरी प्रदूषण झाले तरी ते चुकीचे असल्याचे शास्त्रात सांगितले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी जलप्रदूषण रोखण्याचा संदेश दिला.

पंतप्रधान मोदी यांंनी गांधी जयंतीचीही आठवण करून दिली. 2 ऑक्टोबरला देशभर गांधी जयंती साजरी केली जाते. यंदा या दिवशी देशवासियांनी अनोखा विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत देशात खादी आणि हातमागाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे. दिल्लीतील खादी शोरूममध्ये एका दिवसात एक कोटीहून जास्त रुपयांची आर्थिक उलाढाल अनेकदा झाली आहे.

येत्या 2 ऑक्टोबरला बापूजींच्या जयंतीला आपण पुन्हा एक नवा विक्रम करूया. तुमच्या शहरात जेथे कुठे खादी, हातमाग, हस्तकलेच्या वस्तूंची विक्री होत असेल तेथून वस्तू खरेदी करा. दिवाळीचा उत्सवसुद्धा लवकरच येणार आहे. त्यामुळे आपली सर्व खरेदी अशा ठिकाणाहून करून ‘व्होकल फॉर लोकल’ या अभियानाचे आतापर्यंतचे सगळे उच्चांक मोडूया, असे पंतप्रधानांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या