Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएमबीए, सीईटीचा पेपर सुरु असताना सर्व्हर डाऊन

एमबीए, सीईटीचा पेपर सुरु असताना सर्व्हर डाऊन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज व्यवस्थापनशास्त्र शाखेतील (Management Science) एमबीएच्या (MBA) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा (CET Exam) सुरू होताच नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावर

- Advertisement -

एमबीए (MBA), सीईटीच्या (CET) पेपर सुरु असताना सर्व्हर डाऊन (Server down) झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ वाया गेल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला. बराचवेळ तनाव निर्माण झाल्याने पंचवटी पोलिासांना (Panchavati Police) घटनास्थाल जाऊन वातावरण शांत करावे लागले. नाशिकच्या पंचवटी (panchavati) परिसरात असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये (Polytechnic College) एमबीए, सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ झाला.

विद्यार्थ्यांनी (students) केलेल्या आरोपानूसार हॉलतिकीटवर अडीच तासाची वेळ होती. मात्र स्क्रिनवर 180 मिनिटे दाखवण्यात आली. तसेच परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन (Server down) होऊन अडचणी देखील आल्या. जिल्ह्यातून 431 विद्यार्थी येथे दाखल झाले होते. या अडचणीमुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झालेे. त्यांनी महाविद्या्लय प्रशासनाला घेराव घालुन जाब विचारला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांत केले.

विद्यार्थ्यांकडून पोलिसांकडे तक्रारीही केल्या. या प्रकारमुळे आमचे मोठे शैक्षणिक नुकसान (Educational loss) होणार असून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी किंवा गुण वाढवून द्यावे. अशी मागणी केली. दरम्यान एमबीए, सीईटी परीक्षेचा आज राज्यभरात पेपर होता. नाशिक शहरात देखील अनेक केंद्रावर ही परीक्षा होती. साधारण महा-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा ऑनलाईन सीबीटी मोडमध्ये घेतली जाते.

तर एकूण परीक्षेचा कालावधी 150 मिनिटांचा असतो, यात एमएएच सीईटी परीक्षेच्या पॅटर्ननुसार, 4 विभागांमधून 200 प्रश्न विचारले जातात, मात्र यावेळी अडीच तासांचा पेपर असताना स्क्रिनवर 180 मिनिटे दिसून आली, तसेच पेपरच्या मध्ये तांत्रिक गोंधळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या