Thursday, April 25, 2024
Homeजळगावमेहुण्याचा खून करणार्‍या शालकाला सात वर्षाची शिक्षा

मेहुण्याचा खून करणार्‍या शालकाला सात वर्षाची शिक्षा

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

बहिणीशी भांडण (Quarrel) करीत असल्याच्या रागातून मेहुण्याला विटांनी मारून विहिरीत फेकून देणार्‍या दिवाकर प्रभाकर जाटाळे (वय-40) रा. देऊळगाव गुजरी ता. जामनेर याला जिल्हा न्यायालयाने (District Court) दोषी ठरवत सात वर्ष कैद व 30 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा न्या. एस.जी.ठुंबे यांनी गुरूवारी सुनावली आहे.

- Advertisement -

आरोपी दिवाकर जटाळे हा 28 डिसेंबर 2019 रोजी बहिण स्वाती संजय पाटील यांच्याकडे आला होता. तेव्हा दरवाजातच मेहुणा संजय पाटील व दिवाकर यांच्यात वाद झाला. या भांडणाला घाबरुन स्वाती व त्यांची मुलगी विद्या यांनी दरवाजा बंद करुन आतून कडी लावून घेतली. यावेळी दिवाकर याने छातीवर बसून संजय यांच्या तोंडावर विटांनी मारहाण करुन जवळच्या विहिरीत फेकून दिले होते.

याप्रकरणी स्वाती पाटील यांच्या फिर्यादीवरुन भाऊ दिवाकर जटाळे याच्याविरुध्द पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.तपासाधिकारी राकेशसिंग परदेशी यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले.

मयताची पत्नी स्वाती, मुलगी विद्या या प्रत्यक्षदर्शीसह 14 जणाच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. त्यामुळे आरोपी दिवाकर जाटाळे याला दोषी ठरवत सात वर्ष कैद व 30 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या