Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक मनपात आता 'सेल्फी अटेंडन्स' अनिवार्य

नाशिक मनपात आता ‘सेल्फी अटेंडन्स’ अनिवार्य

नाशिक | Nashik

महापालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav) यांच्या आदेशानुसार नाशिक महानगर पालिकेत (Nashik Municipal Commission) आता “सेल्फी अटेंडन्स’ अनिवार्य (Selfie Attendance) करण्यात आले आहे…

- Advertisement -

यामधून महिला, अपंग व ५० वर्षावरिल वयोवृद्ध सेवक तसेच वैद्यकीय आजार असणाऱ्या सेवकांना सेल्फी हजेरीमध्ये अर्धा तासाची सुट देण्यात यावी, अशी मागणी सम्यक शक्ती जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनपातील सर्व अधिकारी व सेवक हे आदेशपासून नियमाने काटेकोरपणे पालन करित आहे. त्यात कार्यालयीन कर्मचारी कार्यालया बाहेरील कर्मचारी तसेच रस्त्या साफसफाई करणारे सफाई कमर्चारी, बिगारी यांचाही समावेश आहे.

यातील काही सेवक हे आपल्या हजेरी ठिकाणापासुन घराच्या अंतराने दुर राहतात. त्यातील बऱ्याच सेवकांकडे स्वतःची वाहने नसल्याने बस सेवा, रिक्क्षा किंवा नातेवाईकांच्या सोबत हजेरीशेडवर वा कार्यालयात हेजरीसाठी यावे लागते.

यामध्ये महिला कर्मचारी वर्ग (Women Employee), अपंग कर्मचारी वर्ग व वयोवृध्द (५० वर्षावरील) कर्मचारी वर्ग, तसेच वैद्यकीय आजार असलेला कर्मचारी वर्ग यांचाही समावेश असल्याने अशा कर्मचाऱ्यांना सेल्फी हजेरीमध्ये नियमाचे उल्लघन न करता किमान अर्धा तासाची सुट व इतर कर्मचारी यांना किमान १५ मिनीटांची सुट मिळवी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष मिलिंद काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या