Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर तांबेंची निवड करा

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर तांबेंची निवड करा

राहाता (प्रतिनिधी) – राहाता काँग्रेसच्यावतीने शिर्डी संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करावा व त्याचे अध्यक्षपद नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे यांना द्यावे. असा एकमताने ठराव करण्यात आला. राहाता काँग्रेस कमिटीच्या बैठकीत तशा आशयाचा ठराव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांची प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी ठरावाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर यांनी संस्थानसह परिसराचा विकास होण्याकरिता संस्थानचे अध्यक्षपद डॉ. तांबेंना मिळाले पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका सानप यांनी आपण आजच्या कार्यकारीच्या बैठकीत घेतलेला संस्थान अध्यक्षाचा ठराव पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी, बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे, यांची भाषणे झाली.

या बैठकीस भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ , पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, अमृत गायके, सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, युनुसभाई, मुन्ना फिटर, अरुण जाधव, अभिषेक वाघमारे, मदन मोकाटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले

- Advertisment -

ताज्या बातम्या