Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनशेच्या औषधांचा साठा जप्त; तिघांना अटक

नशेच्या औषधांचा साठा जप्त; तिघांना अटक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील नवीन व जुने बसस्थानक परिसरात विशेष पोलीस पथकाने नशा व गुंगीसाठी वापरण्यात येणार्‍या कुत्ता गोळींसह औषधे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करत हजारो रुपयांच्या गोळ्या व औषधांचा साठा जप्त केला आहे. गुजरात राज्यातील सुरत येथून नशा व गुंगीसाठी ही गोळ्या व औषधे विक्रीसाठी आणली गेल्याचे पोलीस कारवाईत पुन्हा उघडकीस आले आहे.

- Advertisement -

शहरातील जुने बसस्थानक परिसरात अवैधरीत्या नशा व गुंगीसाठी कुत्ता गोळी व औषधांच्या बाटल्यांचा साठा विक्रीसाठी आणण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांना मिळताच अ.पो. अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील, शहर स.पो.नि. सावंजी, हवा. इमरान सय्यद, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, अश्विनी पाटील, औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांच्या पथकाने सापळा रचून शफी उज्जेमा जैनुल आबदीन (60, रा. सुरत) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे कुत्तागोळीसह गुंगी आणणार्‍या औषधांच्या बाटल्यांचा 3 हजार 15 रुपयांचा विक्रीसाठी आणलेला साठा मिळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता या नशेच्या गोळ्या साजीद क्लिनर व कलीम गिट्टक यांना देण्यासाठी आणल्याचे शफीने सांगितल्याने पोलिसांनी त्वरेने दोघांचा शोध घेतला असता कलीम मिळून आला तर साजीद क्लिनर फरार झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन बसस्थानकालगत असलेल्या जलकुंभालगत मुमताज अहमद मोहंमद जाबीर व मोहंमद हुसेन अब्दुल जब्बार हे दोघे नशा आणणारी कुत्तागोळी विकत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकास मिळताच त्यांनी छापा टाकून 26,440 रुपयांच्या औषधांच्या साठ्यासह रोख रक्कम व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या