Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशतालिबानबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरून सपा खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा

तालिबानबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सपा खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा

दिल्ली | Delhi

अफगानिस्तान (Afghanistan) पूर्णपणे तालिबानी (Taliban) वर्चस्वाखाली गेला आहे. अमेरिकेने (United States) आपल्या सैन्याच्या फौजा अफगानिस्तानाताून परत बोलावल्या. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच अफगानिस्तानवर तालीबानी संघटनेने (Taliban Organization) कब्जा मिळवला. अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर महिलांचे हक्क आणि संरक्षण याविषयीदेखील जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत असताना आणि भारतासाठी (India) तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच असताना लोकसभेतील खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, तालिबानची तुलना थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी केली. दरम्यान प्रकारानंतर उत्तर प्रदेशच्या संभलमधील समाजवादी पक्षाचे लोकसभा खासदार शफीकुर रेहमान बर्क (MP Shafiqur Rahman Barq) यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनीही तालिबानचं समर्थन केलं आहे. ‘एका नि:शस्त्र समाजाने बलाढ्य शक्तींचा पराभव केला आहे. ते काबुलच्या राजवाड्यात शिरले, संपूर्ण जगाने हे पाहिलं. त्यांच्यात कोणताही गर्व किंवा अहंकार नव्हता. तालिबानी तरुण काबूलच्या मातीचं चुंबन घेत आहेत. अभिनंदन. दूरवर बसलेला हा हिंदी मुस्लिम तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो’, असं मौलाना सज्जाद नोमानी यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या