Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'राफेल' विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल

‘राफेल’ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल

दिल्ली | Delhi

भारतात तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. बुधवारी संध्याकाळी गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमाने उरतली आहेत.

- Advertisement -

भारतीय वायुदलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दाखल झालेल्या तीन राफेल विमानांनी फ्रान्समधून उडाण घेतली असून मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले.

भारताने फ्रान्ससह 59 हजार कोटींचा करार करून एकूण 26 विमानाची खरेदी केली आहे. यापैकी पाच राफेल विमानांची पहिली बॅच पंजाबमधील अंबालामध्ये दाखल झाली होती. तर, राहिलेले 28 राफेल विमान टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होणार आहेत. आज ही तीनही विमानं अंबाला एअरबेसवर जातील. राफेल विमानांची पहिली तुकडी अंबाला येथे आणि दुसरी बंगालच्या हशिमारामध्ये तैनात असेल. पुढील दोन वर्षांत ३६ रफेल विमानांचा हवाई दलात सामवेश होईल. या विमानांच्या समावेशामुळे हवाई दलाची ताकद खूप वाढणार आहे. खासकरून चीनशी जो तणाव सुरू आहे यापार्श्वभूमीवर राफेलमुळे लडाखमध्ये भारताची ताकद वाढत आहे. या लढाऊ विमानात मेट्योर, स्कल्प, माइका यासारख्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे हे विमान अतिशय संहारक बनले आहे. जे शत्रूला हवेतून हवेत आणि जमिनीवरही ठार मारू शकते.

अतिशय किचकट मोहीम पार पाडून राफेल लढाऊ विमानं मायभूमित प्रोफेशनल आणि सुरक्षितपणे दाखल झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या