Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIPL 2022 Mega Auction : लिलावाचा दुसरा दिवस; कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

IPL 2022 Mega Auction : लिलावाचा दुसरा दिवस; कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

बंगळूरू | Bangalore

आयपीएल (IPL) मेगा लिलाव (Mega Auction) बंगळूरूमध्ये (Bangalore) आयोजित करण्यात आला आहे. काल (दि. १२) लिलावाच्या पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंवर यशस्वी बोली लावण्यात आली…

- Advertisement -

आज दुसऱ्या दिवशीदेखील अनेक खेळाडूंना आपले खरेदीदार मिळणार आहेत. पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांनी प्रत्येकी १३ खेळाडू खरेदी केलेले आहेत.

IPL 2022 Mega Auction : पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर सर्वात महागडे खेळाडू

दोन्ही संघ अजूनदेखील १२ खेळाडूंना त्यांच्या संघात सामील करू शकतात. कुठलाही संघ जास्तीत जास्त २५ खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकतात. थोड्या वेळापूर्वीच लिलावास सुरुवात झाली आहे.

IPL 2022 Mega Auction : खेळाडूंची यादी जाहीर; ५९० क्रिकेटपटूंवर लागणार बोली

कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

  • चेन्नई सुपर किंग्ज – २०.४५ कोटी.

  • दिल्ली कॅपिटल्स – १६.५० कोटी.

  • गुजरात टायटन्स – १८.८५ कोटी.

  • कोलकाता नाइट रायडर्स – १२.६५ कोटी.

  • लखनौ सुपर जायंट्स – ६.९० कोटी.

  • मुंबई इंडियन्स – २७.८५ कोटी.

  • पंजाब किंग्ज – २८.६५ कोटी.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ९.२५ कोटी.

  • सनरायझर्स हैदराबाद – २०.१५ कोटी.

पहिल्या दिवशी ठरलेले महागडे खेळाडू

  • ईशान किशन – १५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)

  • दीपक चहर – १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)

  • श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)

  • शार्दुल ठाकूर – १०.७५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)

  • वनिंदू हसरंगा – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

  • निकोलस पूरन – १०.७५ कोटी (सनरायझर्स हैदराबाद

  • हर्षल पटेल – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

- Advertisment -

ताज्या बातम्या