Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविज्ञान आणि साहित्य हे संस्कृतीचे दोन पंख - अभिनेत्री मोहिनी भगरे

विज्ञान आणि साहित्य हे संस्कृतीचे दोन पंख – अभिनेत्री मोहिनी भगरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विज्ञान आणि साहित्य Science and literature हे संस्कृतीचे culture दोन पंख आहेत.विज्ञानाने भौतिक विकास होतो तर साहित्यकलेमुळे आत्मिक उन्नयन होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत साहित्य कलांतून मूल्यांची जपणूक करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनी भगरे Famous actress Mohini Bhagre यांनी केले.

- Advertisement -

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाने साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर साहित्य दर्शन सप्ताहाचे Sahitya Darshan Saptah आयोजन केले आहे.या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 94th All India Marathi Literary Conventionअध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांच्या साहित्याचा सुबोध परिचय करुन दिला.

येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकमान्य विद्यालयात Lokmanya Vidyalaya संमेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांच्या साहित्य व कार्य कर्तृत्वाचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देण्यासाठी या प्रकल्पाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक महादेव घोडके यांनी सांगितले.याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनी भगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविक व परिचय राजेन्द्र बिर्‍हाडे यांनी केले. लीना पुराणिक यांनी डॉ.जयंत नारळीकरांची एक कथा सांगितली. भीमा पालवे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन गीता कौटकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या