Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रSchool Bus Accident : स्कूल बस उलटली, ८ विद्यार्थी गंभीर जखमी

School Bus Accident : स्कूल बस उलटली, ८ विद्यार्थी गंभीर जखमी

हिंगोली | Hingoli

येथे एका शाळकरी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यात ८ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. वसमत तालुक्यातील बाभुळगाव ते वाखारी मार्गावर ही घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…

- Advertisement -

वसमत येथे युनीव्हर्सल इंग्लीश स्कुल हि केजी ते 10 पर्यंत शाळा आहे. वसमत शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाहतुक करण्यासाठी शाळा प्रशासनाकडूनच बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या बसद्वारेच ये-जा करतात.

“ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले…”; शरद पवार यांची हरी नरके यांना श्रद्धांजली

आज सकाळी नेहमीप्रमाणे लहान, लोण, वाखारी या भागातील सुमारे 30 ते 35 विद्यार्थी घेऊन बस वसमतकडे निघाली होती. बाभुळगाव ते वाखारी मार्गावर एका वळणावर चालकाने बसचे ब्रेक दाबले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

या अपघातात जखमी झालेल्या आठ विद्यार्थ्यांना उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताला वाहन चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Talathi Exam Schedule : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा सुरू

- Advertisment -

ताज्या बातम्या