Friday, April 26, 2024
Homeनाशिकअनुसूचित जाती समितीने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

अनुसूचित जाती समितीने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

अनुसूचित जाती समितीने काल रात्री उशिरा त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. समितीच्या अध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्यासह यशवंत माने, लहू कानडे, राजेश राठोड यांनी दर्शन घेतले….

- Advertisement -

त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे स्वागत केले. त्र्यंबकेश्वर देवस्थानची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी, तालुका काँगेस कमिटी अध्यक्ष संपत सकाळे, उपनगराध्यक्षा शिल्पा रामायणे आदी उपस्थित होते.

यानंतर त्र्यंबकमधील एका वसतिगृहाला भेट देण्यासाठी समितीचे सदस्य रवाना झाले. तर आ. प्रणिती शिंदे या नाशिककडे बैठकीसाठी रवाना झाल्या.

त्र्यंबक तालुक्यामध्ये पेसाअंतर्गत 118 गावे असल्याने समिती पंचायतला भेट देईल, अशी चर्चा होती पण ती फोल ठरली.

- Advertisment -

ताज्या बातम्या