Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशSBI कडून ग्राहकांना महत्वाचा 'Alert' जारी

SBI कडून ग्राहकांना महत्वाचा ‘Alert’ जारी

दिल्ली । Delhi

भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करुन एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. बँकेने ग्राहकांना आवाहन केलं आहे की, एसबीआयच्या (SBI) नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका. एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

- Advertisement -

एसबीआयने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहा. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते’ यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करा.”

तसेच, कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. बँकेने ग्राहकांना सतर्क करण्यासाठी आणखी एक संदेश जारी केला आहे. त्यामध्ये जर तुमच्यासोबत फसवणूक झाली तर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत पोर्टलवर राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी अशी माहिती देतस तक्रार नोंदवू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या