Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशएसबीआयने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला 'हा' मोठा बदल

एसबीआयने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली | New Delhi

एसबीआयने (SBI) एटीएममधून (ATM) पैसे (Money) काढण्याच्या नियमात मोठा बदल केला असून त्यानुसार आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, एसबीआयचे ग्राहक (Customer) या नवीन नियमानुसार ओटीपीशिवाय (OTP) पैसे काढू शकत नाहीत. यात पैसे काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळतो, जो टाकल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. तसेच हा नंबर जर टाकला नाही तर एटीएममधून पैसे काढता येणार नाही.

शिंदे गटाला केंद्राकडून मिळणार ‘हे’ मोठे गिफ्ट

असा आहे नियम?

ग्राहकांना फसवणुकीपासून (Fraud) वाचवण्यासाठी बँकेने १० हजाराहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेला एक ओटीपी आणि त्यांच्या डेबिट कार्डच्या पिनसह प्रत्येकवेळी आपल्या एटीएमद्वारे १० हजाराहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते.

- Advertisment -

ताज्या बातम्या