Friday, April 26, 2024
Homeनाशिकसावकी-विठेवाडी पुलावरील वाहतुक पुन्हा बंद

सावकी-विठेवाडी पुलावरील वाहतुक पुन्हा बंद

भऊर | वार्ताहर Bhaur

गिरणा नदीला ( Girna River ) आलेल्या पुरामुळे सावकी-विठेवाडी पूल ( Savki- Vithevadi Bridge ) जवळपास दोन दिवस पाण्याखाली गेला होता.

- Advertisement -

आज दि. २३ रोजी पुलावरील पाणी ओसरल्याने सावकी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय बोरसे यांनी स्वयंस्फूर्तीने पुलावरील गाळ काढत पूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र आज पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

काल दि. २२ रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नदीची पाणी पातळी खाली गेल्याने सावकी-विठेवाडी पुलावरील पाणी ओसरले. पुराच्या पाण्यामुळे पुलावर पुर्णतः गाळाचे साम्राज्य झाले होते. पाणी कमी होऊन देखील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास अडचणी येत होत्या.

ही बाब सावकी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय बोरसे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टरच्या साह्याने या पुलावरील गाळ साफ केला. गाळ साफ झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

मात्र नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्याने सावकी विठेवाडी पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या