Thursday, April 25, 2024
Homeनगरशनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद

शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dada Patil Shelke Agricultural Produce Market Committee) नेप्ती उपबाजार (Nepti Sub Market) आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार (व्यापारी) यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद मिटलेला नाही (Dispute is not Settled). यामुळे शनिवार (दि.4) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद (Onion Auction Closed) ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी जाहीर केले.

- Advertisement -

गुरूवारी देखील कांदा लिलाव (Onion Auction) असतांना वाराईच्या विषयावरून व्यापारी आणि वाहतूकदार (Merchants and Transporters) यांच्यात वाद (Dispute) झाला होता. त्यात शिवसेनेच्यावतीने बाजार समितीच्या (Shivsena Market Committee) आवारात आंदोलन (Movement) केल्याने दुपारी तीननंतर कांदा लिलाव (Onion Auction सुरू झालेल होते. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत वाराईवरून झालेल्या वादात (Dispute) तोडगा न निघाल्याने शनिवारपासून बेमुदत बंदची हाक जिल्हा व्यापारी असोसिएशेने दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या