Friday, April 26, 2024
Homeनगरसार्वमत एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजकांना व्यासपीठ

सार्वमत एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजकांना व्यासपीठ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दैनिक सार्वमत आयोजित बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तसेच महिला बचत गटांना व्यासपिठ मिळाले आहे, असे प्रतिपादन समता पतसंस्थेचे संस्थापक व पतसंस्था फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी केले.

- Advertisement -

दैनिक सार्वमत एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे, सुविधा मार्केटचे संचालक संतोष शिंदे, डी. एम. मुळेचे संचालक अभिजित मुळे, दैनिक सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर, बद्रीनारायण वढणे, दैनिक सार्वमतचे जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते फित कापून या खरेदी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

दि. 3 ते 6 मार्च दरम्यान आयोजित या खरेदी महोत्सवाचे मुख्य प्रायोजक कोपरगाव येथील समता नागरी पतसंस्था असून उपप्रायोजक टाटा मॅक्स अहमदनगर, सह प्रायोजक म्हणून श्रीरामपूर येथील अशोक शैक्षणिक संकुल, अहमदनगर येथील सुविधा मार्केटिंग, राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट, श्रीरामपूर येथील डी.एम. मुळे चष्मावाला व सात्रळ येथील साई सात्रळ दूध हे आहेत.

काका कोयटे म्हणाले की, सार्वमत हा नेहमीच सर्वसामान्य माणसांबरोबर राहिला आहे. सार्वमतची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडली गेली आहे. आम्ही वेगवेगळे राष्ट्रीय स्तरावरचे पेपर वाचतो परंतु पतसंस्था फेडरेशनच्या बातम्या केवळ ग्रामीण भागात रुजलेल्या या दैनिक सार्वमतमध्येच वाचायला मिळतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा सर्वप्रथम सार्वमत वर्तमान पत्र वाचण्याची ओढ निर्माण होते. ग्रामीण भागासारख्या ठिकाणी दैनिक सार्वमतने असा एक्स्पो आयोजित केल्यामुळे व्यावसायिक, उद्योजक व महिला बचतगट यांंना एक वेगळे व्यासपिठ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगावमध्ये अशा एक्स्पोसाठी जागा आरक्षीत करुन पक्के गाळे बांधण्यात आले आहेत. त्याचपध्दतीने अन्यत्र अशा मोकळ्या जागा आरक्षीत करुन व्यावसायिकांंना मार्केट उपलब्ध करुन द्यावे. अशा पध्दतीचा प्रस्ताव द्या आम्ही पाठपुरावा करुन तो करण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले, सार्वमत एक्स्पोमुळे एक चांगली संधी व्यावसायिकांना आणि उद्योजकांना मिळाली आहे. या एक्स्पोमध्ये स्थानिक व्यावसायिकांबरोबर नागपूर, जळगाव, पुणे, नाशिक या ठिकाणाहून व्यावसायिक सहभागी झाले आहेत. यामुळे व्यावसायिकांना एक चांगली संधी तर ग्राहकांंना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होणार आहे. निश्चित हा उपक्रम स्त्तुत्य असाच आहे.

सुविधा मार्केटींगचे संतोष शिंदे म्हणाले, आम्ही दक्षिणेत असलो तरी उत्तरेत दैनिक सार्वमतच्या एक्स्पोला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी आम्ही या महोत्सवात सहभागी झालो आहे.

शिवाजीराव कपाळे म्हणाले, यानिमित्ताने सार्वमतने एक चांगली संधी ग्राहकांना मिळवून दिली. दोन वर्ष कोविडमुळे भयभीत झालेली जनता आता काहीही मोकळी झाली आहे. यात सहभागी झालेल्या व्यावसायिकांंना आपला व्यवसाय वाढण्यासाठी एक्स्पोची निश्चित मदत होणार आहे. सार्वमतने सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या एक्स्पोला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. यापुढेही असे एक्स्पो आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले. अपौपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, सात्रळ दूधचे चेअरमन चंद्रकात डुकरे यांनीही या खरेदी महोत्सवास सदिच्छा भेट दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वमतचे जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी केले.आभार वृत्तसंपादक अशोक गाडेकर यांनी मानले. सुत्रसंचलन प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी एक्स्पोमध्ये सहभागी व्यावसायिकांच्या स्टॉलला भेटी देवून वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती घेतली. यावेळी समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, राहुल गागरे, मिलिंद नालकर, अमोल नालकरे, विजय सिनारे, प्रसाद कडू, सहाय्यक जाहिरात व्यावस्थापक रियाज पठाण, वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र बोरसे, उपसंपादक सुनिल नवले, मार्केटिंग अधिकारी गोविंद केंगे, राजेंद्र पानसरे, सुनिल कर्पे, नितीन जाधव, पत्रकार बाळासाहेब भांड, नवनाथ कुताळ, अनिल पांडे, महेश माळवे तसेच विजयराव कुर्‍हे, सतीश म्हसे, हितेश गुंजाळ यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

आज ग्रुप डान्स स्पर्धा

दैनिक सार्वमत आयोजित श्रीरामपूर शॉपिंग महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘सोलो डान्स’ला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात अनेक कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली आज शुक्रवार दि. 4 मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या