Thursday, April 25, 2024
Homeनगरसराफारावरील हल्ला, आरोपींना नेले घटनास्थळी

सराफारावरील हल्ला, आरोपींना नेले घटनास्थळी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील सराफ व्यावसायिक बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्यावर हल्ला करून लुटणार्‍या तिघा आरोपींना पाथर्डी शहरातील नवीपेठ व शेवगावरोड, आनंदनगर परिसरात घटनास्थळी पोलिसांनी तपास कामी गुन्ह्याच्या घटनाक्रमाची महिती आरोपींकडून जाणून घेतली. चिंतामणी यांच्या हल्ल्यानंतर पाथर्डीत तीव्र पडसाद उमटून सर्वपक्षीय कार्यकर्ते व पाथर्डीकरांनी पोलीस प्रशासनावर चांगले तोंड सुख घेऊन ताशेरे ओढले होते.

- Advertisement -

वाढती गुन्हेगारी आणि या घटनेतील आरोपींचा शोध लावा अशा मागणीचा सूर मोर्चात होता. पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून मोर्चा झाल्यानंतर 24 तासांच्या आत या घटनेतील संशयित आरोपी विशाल एडके (रा.पाथर्डी), दीपक राख (रा.नगर), दीपक सोमनकर (रा. रघुहिवरे) या तिन्हीही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन अटक केली. अटकेनंतर या आरोपींनी कशा पद्धतीने हा गुन्हा केला.

त्याची माहिती प्रत्यक्षपणे जाणून घेण्यासाठी पाथर्डी पोलिसांनी या तिघा आरोपींना शहारातील नवी पेठ येथील चिंतामणी यांच्या सोन्याच्या दुकानात आणले. गुन्हा केला त्या दिवशी आरोपींनी चिंतामणी यांचा दुकान बंद करून घरी जाईपर्यंत पाठलाग करून चिंतामणी यांच्या घराजवळच घटना घडली होती. या गुन्ह्यातील जखमी बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी हे याच्यावर हल्ला करून लुटले त्या दिवशी दुकान बंद करून चिंतामणी हे पान घेण्यासाठी कोरडगाव चौकातील पानटपरीजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपींनी चिंतामणी यांचा सावलीप्रमाणे पाठलाग करत अंधाराचा फायदा घेऊन त्यांना घराजवळ गाठले व जखमी करून लुटले.

पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, या गुन्हाचे तपासी अधिकारी सचिन लिमकर हे त्यांच्या पोलीस फौजफाट्यासह नवी पेठ मध्ये दाखल झाले त्यावेळी नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.या प्रकारामुळे नागरिकांना पोलिसांचे अस्तित्व जाणवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या