भेटी लागे जीवा ! उद्या संत निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान!

jalgaon-digital
1 Min Read

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

उद्या सोमवारी पहाटे पाच वाजता संत निवृत्तीनाथ पालखीचे (Sant Nivruttinath Palkhi पंढरपूर (Pandharpur) कडे आषाढ वारीसाठी (Ashadhi Ekadashi) शिवशाही बसने (Shivshahi bus) प्रस्थान होणार आहे.

दोन बसमधून सामील होणाऱ्या चाळीस वारकरी (Warkari) यादी श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान यांनी जाहीर केली आहे. सामील वारकऱ्यांची RTPCR टेस्ट (RTPCR Test) करण्यात आली आहे. पायीवारीला परवानगी नसल्याने या बस वारीचे नियोजन प्रांताधिकारी तेजस चव्हाण (Tejas Chawan) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.

पहाटे संत निवृत्तीनाथ मंदिरत पूजा होईल. कुशावर्त तीर्थ (Kushwart Tirth) येथे देवाची आरती नगराध्यक्षांच्या हस्ते होईल. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अभंग होतील टाळ-मृदंगाच्या गजरात शिवशाही बसने पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होईल.

सलग दुसऱ्या वर्षी संत निवृत्तीनाथ महाराज श्री हरी पांडुरंग भेटीला शिवशाही बसने रवाना होणार आहेत मंदिराजवळ बसेस सजवण्याचे काम सुरु आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *