Friday, April 26, 2024
Homeब्लॉगसंकल्प

संकल्प

नमस्कार,वाचकहो, इंग्रजी नववर्ष सुरू होऊन 22 दिवस कसे झालेत ते कळलेच नाही. इंग्रजी असो वा मराठी नववर्ष. नववर्ष आले की आपण मनात एक संकल्प करत असतो. ‘संकल्प’ म्हणजे दृढ़ निश्चय, विचार, हिंदीत इरादा. तर इंग्रजीत रिसॉल, ड्रिम असे म्हटले जाते. एकूणच काय तर या तीन्ही भाषांतील या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ काढला तर एखादी बाब आपल्याला आवडली की ती पूर्ण करेपर्यत आपण स्वस्त बसत नाही. वय वर्ष शुन्य ते अंतिम श्वास घेईपर्यंत आपण खूप सारे ‘संकल्प’ करत असतो. यातील मोजकेच ‘संकल्प’पूर्ण होत असतात. तर काही पूर्ण होण्याइतपत येत असतांना आपण कंटाळा करून सोडून देतो. तर काही ‘संकल्प’ ‘संकल्प’च बनुन राहतात. की जे शेवटपर्यंत पूर्ण होत नाहीत. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला त्याचे वाईट वाटते. अरेरे हे शक्य असतांना दूर्लक्ष आणि कंटाळा किंवा अंहमपणा यामुळे ते मी पूर्ण करू शकलो नाही. असे मन सांगत असते.

नमस्कार, वाचकहो, इंग्रजी नववर्ष सुरू होऊन 22 दिवस कसे झालेत ते कळलेच नाही. इंग्रजी असो वा मराठी नववर्ष. नववर्ष आले की आपण मनात एक संकल्प करत असतो. ‘संकल्प’ म्हणजे दृढ़ निश्चय, विचार, हिंदीत इरादा. तर इंग्रजीत रिसॉल, ड्रिम असे म्हटले जाते. एकूणच काय तर या तीन्ही भाषांतील या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ काढला तर एखादी बाब आपल्याला आवडली की ती पूर्ण करेपर्यत आपण स्वस्त बसत नाही. वय वर्ष शुन्य ते अंतिम श्वास घेईपर्यंत आपण खूप सारे ‘संकल्प’ करत असतो. यातील मोजकेच ‘संकल्प’पूर्ण होत असतात. तर काही पूर्ण होण्याइतपत येत असतांना आपण कंटाळा करून सोडून देतो. तर काही ‘संकल्प’ ‘संकल्प’च बनुन राहतात. की जे शेवटपर्यंत पूर्ण होत नाहीत. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला त्याचे वाईट वाटते. अरेरे हे शक्य असतांना दूर्लक्ष आणि कंटाळा किंवा अंहमपणा यामुळे ते मी पूर्ण करू शकलो नाही. असे मन सांगत असते.

वाचकहो, ‘संकल्प’ शब्द तसा छोटा असला तरी त्यात आपल्या आयुष्याचे फार मोठे सार लपलेले आहे. काहींना हे सार गवसते, उमगते. पण काहींना समजून, उमगुनही ते त्या प्रमाणे करू शकत नाही. कारण काय तर नसलेली प्रबळ इच्छा शक्ती, अर्थात आत्मशक्ती आणि न मिळालेले इतरांचे सहकार्य.

- Advertisement -

शुन्य वयोगटातील बालकाचा ‘संकल्प’ काय असू शकतो. असा विचार केला तर वेडात काढाल. पण तसे नाही. या वयोगटातील अजान बालकाचाही ‘संकल्प’ असतो. तो म्हणजे आईचे प्रेम आणि आहार. या दोन्ही बाबी त्याला वेळेवर मिळाल्या तर बालकाची शरीरिक व मानसिक वाढ उत्तम होत असल्याचे डॉक्टर सांगतात. या बाबी मिळवण्यासाठी ते बालक त्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा ते रडून सांगत असते. कारण त्याची प्राथमिक गरज त्याची आई असते. आईच त्याचे सारे जग असते. संकल्पाची ओळख येथून होत असते. पण ते कळत नाही. मुल जसजसे मोठे होत शाळेत जाऊ लागते तसतसं त्याला आयुष्याचा अर्थही कळू लागतो. शिक्षण घेऊन नोकरी करून अर्थाजन करत परिवाराचा विस्तार करण्याचा संकल्प तो करत असतो. यासोबतच त्याला ज़े आवडते किंवा ज्यात आनंद, आत्मानंद मिळतो तो संकल्प तो करत असतो.

आता प्रश्न येतो तो हे ‘संकल्प’ पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेतो. वाचकहो, या ‘संकल्प’ पूर्तीतच त्याला जीवनाचा आनंद, नुसताच आनंद नव्हे तर आत्मां नद मिळतो असतो. हा आनंद तो केवळ एकटाच अनुभवत असतो का ? तर नाही. त्याच्यारसोबत त्याचा परिवार, त्याचे मित्र, नातेवाईक व त्याचे सहकारी ही या आनंदाचा अनुभव घेत असतात. कारण त्याच्याव या संकल्पो पूर्तीत कोठे तरी त्यांचांही प़्रत्यक्ष अप़्रत्यणक्षपणे हातभार लागलेला असतो. हा आनंद, हे प्रेम पैशाने कधीच विकत घेता येत नाही.

‘संकल्प’ एका व्यक्तीचा किंवा समुहाचा असतो. तो पूर्ण करण्यासाठी त्याच्यासह समूहातील सारे सदस्य हे आपापल्या परीने हातभार लावत असतात. प़्रयत्नातील सातत्य आणि ते पूर्ण करण्याची मनाची जिद्द यावर ‘संकल्प’ची परिपुर्ती ठरत असली तरी परिवार आणि मित्र यांची साथही मोलाची ठरत असते. कारण जंगलात एकटा वाघ शिकार करू शकतो. तसे मानवाचे नाही. भलेही तो एकटा अर्थाजन करत असला तरी त्याला घरासह मित्र आणि जेथे काम करत असतो तेथील सहकारी यांचीही मदत होत असते. हो, एक मात्र नक्की की या ‘संकल्पा’त वरील सर्वांचा विचार केला असेल तर हा ‘संकल्प’ वेळेत पूर्ण होत असतो. अशा पूर्ण झालेल्या ‘संकल्पा’चा आनंद हा दिर्घकाळ टिकत असतो. यातूनच पुन्हा नवा ‘संकल्प’ करून तो पूर्ण करण्याच्या नव्या ‘संकल्पा’चा जन्म होत असतो. ‘संकल्प’ जसा चांगला तसा वाईटही असू शकतो. अर्थात वाईट संकल्पाचे पडसादही वाईटच असतात हे सर्वांना माहित आहे आणि तसा अनुभवही घेत असू.

एकूणच काय तर रोज ‘संकल्प’ करावे आणि ते पूर्ण करण्याससाठी प़्रामाणिकपणे, जिद्दीने पूर्ण करावे. त्यासाठी जे जे तुम्हाला मदत करतील त्यांचा विश्वाससघात करू नये. तसे झाल्यास तुमचे ‘संकल्प’ कधीच पूर्ण होणार नाही. कारण एका यशातून दुस़र्‍या यशाचा मार्ग असतो. तसेच एक ‘संकल्प’ पूर्ण झाल्यानंतरच दुसरा संकल्पही पूर्ण होऊ शकतो.या ‘संकल्पा’बाबत एक उदाहरण देतो. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरला एका पत्रकांराने एक प्रश्न विचारला होता. तो असा की, मैदानात खेळण्यास उतरल्यानंतर तुम्ही शंभर धावांचे लक्ष्य / ध्येय ठेवतात का? त्यावर सचिन म्हणाला की असे मूळीच नाही. मी मैदानात खेळण्यासाठी पाऊल ठेवतांना एकच विचार / ध्येय / लक्ष्य ठेवतो की मला एका चेंडुवर एक धाव काढायचीच आहे. ती धाव काढली की दुसर्‍या चेंडुवर दोन धावा काढ़ण्याचे ठरवतो. तिस़र्‍या चेंडुवर तीन धावा काढण्याचे मनात ठरवतो. त्यानुसार येण्यार्‍या चेंडूवर लक्ष केंद्रीत करून तो टोलवतो. यात यशस्वी झालो की पुढच्या चेंडुवर चौकार आणि षटकार मारण्याचे लक्ष्य ठरवतो. अशा रितीने बाद होईपर्यंत धाव संख्या वाढवत असतो. एक सामना जिंकला की दुसरा सामना जिंकण्याासाठी प्रयत्न करतो. असे करत मी धावांचा आणि यशाचा विक़्रम करत असतो.

व्यक्तीपरत्वे ‘संकल्प’ बदलत असतात. शालेय विद्यार्थी असतांना चांगले मार्कस मिळविण्याचा,महाविद्यालयीन विद्यार्थी असतांना सुवर्णपदक मिळविण्याचा, चांगल्या पगाराची व चांगल्या पदावरील नोकरी मिळवण्याचा ‘संकल्प’, चांगला जीवनसाथी मिळविण्याचा ‘संकल्प’, पुरस्कार व बढती मिळविण्याचा ‘संकल्प’ असे कितीतरी ‘संकल्प’ आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत आपण करत असतो.

राजकारणी व्यक्ती असेल तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीपद मिळविण्याचा ‘संकल्प’ असतो. यासोबतच माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्यालाही अशी पदे मिळविण्यासाठी ते खटाटोप करत असतात.

शासकीय अधिकारी असले तर दिवसभरात आलेल्या कामांचा त्वरीत निपटारा करण्याचा आणि वेळोवेळी पगरावाढीसह बढती मिळवण्याचा संकल्प असतो.

नोकरीतून निवृत्त होण्याआधी मुलामुलींचे विवाह होऊन ते सेटल कसे होतील यासाठी प्रयत्न करत असतात. तर काही सेवानिवृत्तीनंतर ही नवी नोकरी, उद्योगधंदा किंवा शेती करण्याचा संकल्प करतात. आणि त्यानुसार ते प्रयत्नही करत असतात. अशी अनेक उदाहरणे आहे की निवृत्तीनंतर अनेकांनी उद्योग व्यवसाय आणि शेतीत यशस्वी झाली आहेत.

तर काहीजण सर्वकाही चांगले असताना शिक्षणातील विविध पदव्या घेण्याचा संकल्प पूर्ण करत असतात. यापैकी एक नाव म्हणजे दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील आचगाव येथील रहिवासी असलेल्या डॉ. जिचकर यांच्याकडे तीन चार नव्हे तर तब्बल 20 पदव्या होत्या. आयएएस, आयपीएस, डॉक्टर, पत्रकार अर्थशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी, लोकप्रशासन, राजनिती विज्ञान, मनोविज्ञान याविषयांत त्यांनी प्रथम श्रेणी मिळविली.यामुळेच त्यांना भारतातील सवार्र्त योग्य व्यक्ती म्हणून समजले जाते. डॉ. जिचकर यांनी हे सर्व साध्य केले ते संकल्पांतूनच आणि त्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच. अर्थाजन करण्यास लागले म्हणजे सेटल झाले असे नव्हे. अर्थाजन ही तर आयुष्य जगण्याची सुंदर पायरी आहे. तर आयुष्य सर्वगुण संपन्न होण्यासाठी विविध विद्या शाखांचा अभ्यास करत राहणे महत्त्वाचे आहे. यातून आपल्या ज्ञानात भर पडून आपले आयुष्य अधिक तेजोमान होण्यास मदत होते. शिवाय आपल्या सहवासात येणार्‍यांचेही आयुष्य सुंदर होण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत होत असते. शिक्षणानेच आयुष्य सुंदर होते का असा असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण आज समाजात असे अनेक लोक आहेत की ज्यांना शिक्षणाचा गंधच नाही. मात्र तरीही ते यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. असे असले तरी त्यांना काही ठिकाणी मर्यादा येतात. याच मर्यादा शिक्षणाने तोडल्यात. याच उदाहरण म्हणजे राजकारणी लोकांचे देता येईल. भारताने लोकशाही स्विकारली आहे. त्यानुसार वयवर्ष 18 पासून तर त्याची इच्छा असेपर्यंत तो निवडणूक जिंकून आमदार, खासदार, नगरसेवक असे होऊ शकतो. भलेही तो अंगठेबहाद्दर असला तरी. असे लोकप्रतिनिधी व्यवहारात हुशार असले तरी विद्येच्या प्रांगणात ते बॅक बेंचर असतात. हेही तेवढेच खरे. निवडणूक जिंकल्यानंतर अशांना माध्यम प्र्रतिनिधी निवडूण आल्यानंतर तुमचा काय संकल्प आहे असे विचारले असता त्यांच्या समोर मोठा यक्ष प्रश्न उपस्थित राहतो. निवडूण येण्याच्या संकल्पापर्यंत त्यांनी विचार केलेला असतो. मात्र निवडूण आल्यानंतर मात्र वरिष्ठांच्या संकल्पानुसार ते चालत असतात. याला अपवाद असू शकतात. भलेही त्यांचे संकल्प असले तरी राजकारणात शेवटी पक्षश्रेष्ठीचे संकल्प महत्त्वाचे असतात. काही वेळा यात वादही होत असतात आणि असे प्रतिनिधी त्यांच्या संकल्पपुर्तीसाठी दुसर्‍या पक्षाची वाट धरतात.

एकूणच काय तर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परिने त्याच्या पुरता, परिवारापुरता किंवा पदापुरता संकल्प हा करतच असतो. तो पूर्ण करण्यासाठी येणकेन प्रकारे प्रयत्न करत असतो. त्यात यश मिळेपर्यंत ते प्रयत्न करत असतात. कारण ‘शर्यंत अजुन संपेलली नाही कारण…. अजून मी जिंकलेलो नाही’… अशी धारणाही ते बाळगत असतात. याचप्रमाणे आपणही या नववर्षात असेच छोटे छोटे ‘संकल्प’/ध्येय किंवा लक्ष्य ठरवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. केलेले सर्वच ‘संकल्प’ पूर्ण होतीलच असे नाही. पण म्हणून निराश न होता पुन्हा नवा ‘संकल्प’ करावा. कारण केलेले ‘संकल्प’ पूर्ण करण्यात आपल्या जीवनाचे गमक आहे. चला तर नवीन वर्षात रोज एक चांगला ‘संकल्प’ करत त्याच्या पुर्णत्वासाठी प्रयत्न करू या… यश मिळेलच.

- Advertisment -

ताज्या बातम्या