Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या नामधारी डीबीत अवघे तीन कर्मचारी

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या नामधारी डीबीत अवघे तीन कर्मचारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangmner Police Station) गेल्या काही दिवसांपासून डीबी (DB) नावालाच अस्तित्वात आहे. या शाखेत अवघे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. गुन्ह्यांचा तपास लावणार्‍या या शाखेची अवस्था अपुर्‍या व अकार्यक्षम कर्मचार्‍यांमुळे (Inadequate and inefficient staff) ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

- Advertisement -

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे (Crime control in the city) व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे यासाठी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये डीबी (DB) नावाची स्वतंत्र शाखा अस्तित्वात असते. या शाखेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व सात ते आठ कर्मचारी कार्यरत असावे असे अपेक्षित असते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मात्र वेगळे चित्र आहे. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख (PI Mukundrao Deshmukh) यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डीबीमध्ये अवघे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांवर ही नियंत्रण नसल्याने शहरातील गुन्ह्याचा तपास लागत नसल्याचे दिसून येते.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पूर्वी ‘ए’ (A) आणि ‘बी’ (B) असे डीबीचे दोन विभाग कार्यरत होते. एक विभाग पुरेसा काम करत नसल्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी दुसर्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती करून ‘बी’ शाखा स्थापन केली होती. त्यावेळी ‘बी’ टीम मधील कर्मचार्‍यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश मिळविले होते. यामुळे ही टीम कायम वरचढ ठरली होती. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील डीबीचे आता चित्र बदलले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या डीबीमध्ये अवघे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. संगमनेर (Sangmner) शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. घरफोड्या, वाहन चोरी, पेट्रोल चोरी, मोबाईल चोर्‍या अशा वेगवेगळ्या चोर्‍या होत असतानाही या गुन्ह्यांचा तपास लावण्यात शहर पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येते. डीबीच्या कर्मचार्‍यांचे या चोर्‍यांकडे दुर्लक्ष (Ignoring thieves)होत आहे. यातील काही कर्मचारी रात्रीच्या वेळी ड्युटी करण्याऐवजी बरेचदा झोपलेले असतात अशीही चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

गुन्ह्यांचा तपास लावणे ऐवजी हे कर्मचारी भलतेच काम करताना दिसत आहेत. पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची वारंवार या विभागातून दुसर्‍या विभागात बदली करण्याचे पोलीस अधिकार्‍यांचे धोरण असल्याने पोलीस कर्मचारीही मनापासून काम करताना दिसत नाही.गुन्ह्यांचा तपास लावणे ऐवजी जुन्या गुन्ह्यातील आरोपींना आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम होत असल्याचीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी अस्तित्वात असलेली डीबी बरखास्त करून नवीन डीबीची स्थापना करावी तरच शहरातील गुन्ह्यांचा तपास लागू शकतो, अशी परिस्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या