Thursday, April 25, 2024
Homeनगरतहसीलदारांनी 20 लाखांच्या दोन बोटी केल्या उद्ध्वस्त वाळू

तहसीलदारांनी 20 लाखांच्या दोन बोटी केल्या उद्ध्वस्त वाळू

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विनापरवाना वाळू उपसा करत असलेल्या बोटी रंगेहाथ पकडून 20 लाख रुपयांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील भिमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे अनेक दिवसांपासून वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे यांना समजली. त्यानुसार आज (दि.6) त्यांच्या पथकाने आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पत्रात वाळू उपसा करत असणार्‍या बोटी दिसून आल्या. तहसीलदार यांच्या पथकाला पाहताच बोटी वरील चालक व इतर कर्मचारी पळून गेले. मात्र तहसीलदार यांनी 20 लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या.

वाळू तस्करी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांचे पंटर चौकाचौकांत बसून एकमेकांना खबर देतात. यामुळे अवैध वाळूची वाहतूक शहरातून सुरळीतपणे तालुक्यात होत असते. अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळूतस्करीला आळा बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या