Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीढोकेश्‍वर येथे प्रांताधिकारी-वाळूतस्करामध्ये थरार

टाकळीढोकेश्‍वर येथे प्रांताधिकारी-वाळूतस्करामध्ये थरार

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नगर कल्याण महामार्गावर गुरुवारी रात्री 9.30 वाजता प्रांतधिकारी सुधाकर भोसले हे या महामार्गावरून जात असताना एका वाळूने भरलेल्या डंपरचा पाठलाग केला असता चालकाने डंपरमधील वाळू महामार्गावर टाकत साईडपट्टाजवळील साईड गटारात डंपर उलटला. तसेच चालक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तब्बल दोन किलोमीटर नगर कल्याण महामार्गावर प्रांताधिकारी भोसले व डंपर चालक यांच्यामध्ये हा थरार रंगला होता.

सदर घटना घडल्यानंतर प्रांताधिकारी भोसले यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पोलिस निरीक्षक राजेश गवळी व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. व पुढील कारवाई साठी डंपर ताब्यात घेण्यात आलेला आहे. संबंधित डंपर चालकासह मालकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. या घटनेत डंपर चालकाच्या हाताला जखम झाली असून तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. प्रांताधिकारी डॉ. सुधाकर भोसले हे गुरुवारी रात्री खाजगी कामासाठी टाकळी ढोकेश्वर परिसरातून जात असताना ही कारवाई केली.

- Advertisement -

या घटनेतील डंपरचालक व मालक खडकवाडी येथील असल्याची माहिती पुढे आली असुन या थराराची टाकळी ढोकेश्वर व परिसरात चर्चा रंगली आहे. पारनेर तालुक्यातील मुळा, काळू, कुकडी, मांड ओहोळ, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा केला जात आहे. पुणे ठाणे, मुंबई या ठिकाणी नगर-कल्याण महामार्गावरून शेकडो डंपरनी वाळू वाहतूक केली जात आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी या कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. तर दुसरीकडे वाळूची वाहतूक करणारे डंपर सुसाट या महामार्गावरून पळवत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या