समृद्धी महामार्गाच्या सर्कल पुलाखालील खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन

jalgaon-digital
1 Min Read

जेऊरकुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तिनचारी कोकमठाण भागात नगर-मनमाड मार्गावर सर्कल तयार करण्यात आली आहे. पावसामुळे सर्कल पुलाखाली मोठमोठी खड्डे पडले आहे. 2 ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताह कोकणठाण परिसरात होणार आहे. सप्ताहासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवावे या मागणीसाठी कोकमठाण व जेऊर कुंभारी येथील नागरीकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनाची दखल घेत राजकंट्रक्शन कंपनीच्या अधिकार्‍यांनी तात्काळ खड्डे बुजवुन देण्याचे मान्य केल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. जेऊरकुंभारी व कोकमठाण परिसरातील नागरिकांनी कोकमठाण सर्कलजवळ रस्ता रोको आंदोलन केले. माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाचे अधिकारी दत्ता माने व कंपनीचे श्री. रणजीत यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जावुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

सप्ताहस अडथळा निर्माण होणार नाही. सर्कल खालील रस्ता काँक्रिटीकरण केला जाईल असे सांगितले. यावेळी जालिंदर चव्हाण, वैभव नेरकर, आनंद बिडवे, लखन बिडवे, गोकुळ नेहे, किशोर माळवे, कैलास वाघ, वसंत त्रिभुवन, सुनील अडांगळे, दौलत वक्ते, सुनील कवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *