Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार

शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार

मुंबई | Mumbai

मोठ्या राजकीय घडामोडींनंततर राज्यात सत्तापालट झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) सत्तेत आलं.

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली आहे. पण खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही कायम आहे. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी आता शिंदे गटाने मास्टर प्लान तयार केला आहे.

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आता मुंबईतच नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचं मुख्यालय दादरमध्येच बांधणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दिली.

यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगळं कार्यालय उभारण्यात येणार आहे. परंतु, याबाबत बोलताना सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दादर हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे. याच ठिकाणी शिवतीर्थ आहे तसेच बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे. शिवसेनेच्या सहा दशकांच्या आठवणी या दादरशी, शिवाजी पार्काशी निगडित आहे. याच ठिकाणी शिंदे गटाचं नवं कार्यालय उभे करण्याच्या हालचाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या