Friday, April 26, 2024
Homeनाशिकआरटीई प्रवेश : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश

आरटीई प्रवेश : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश

नाशिक । प्रतिनिधी (Nashik)

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ( RTE )आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांसाठी पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आता गुरुवार (दि.19)पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना (Waiting list Candidates ) प्रवेश ( Admission )मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

प्रवेशासाठी पालकांना गुरुवारी (दि.19) त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होणार आहेत. 27 मेपर्यंत हे प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्या फेरीत नाशिक जिल्ह्यातील 422 शाळांमध्ये 3263 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरी अद्याप 1643 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. 19 ते 27 मे 2022 पर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

जिल्ह्यातील एकूण 4,927 जागांसाठी 16,567 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्याआधारे 30 मार्च रोजी ऑनलाईन सोडत निघाली आणि 4,513 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र 1229 विद्यार्थ्यांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने त्यांनी प्रवेश नाकारला. प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने होत असल्यामुळे पहिल्या फेरीसाठी दोन वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतरही शंभर टक्के प्रवेश झाले नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या