Saturday, April 27, 2024
Homeनाशिक'एलव्हीच'च्या विद्यार्थ्यांनी तयार केले ‘रोल मॉडेल’

‘एलव्हीच’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले ‘रोल मॉडेल’

सातपूर | Satpur

‘स्मार्ट पद्धतीने पार्किंग, स्मार्ट स्ट्रीट लाइट, स्मार्ट कार पार्किंग’ असे काही शब्द कानावर पडले की, भविष्यात काहीसे चित्र असेल असा विचार आपसुकच मनात येतो.

- Advertisement -

मात्र नवीन नाशकातील सावतानगर येथील एलव्हीएच विद्यालयाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचे आताच रोल मॉडेल तयार करीत भविष्यातील या प्रकल्पाचे शिलेदार होण्याची चुणूक दाखविली आहे. अटल टिंकरींग लॅब या निती आयोगाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प साकारले आहे.

इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड इनोव्हेटीव्ह सोल्यूशन या संस्थेच्या माध्यमातून निती आयोगाचा अटल टिंकरिंग लॅब या प्रकल्प राज्यातील विविध माध्यमिक विद्यालयात राबविला जात आहे. एलव्हीएच विद्यालयातही ही लॅब देण्यात आली असून, त्याबाबत तीन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा संकल्पना राबवित भविष्यात उपयोगी पडणारे प्रकल्प साकारले. ‘स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट ट्राफिक सिग्नल, वॉटर लेव्हल डिटेक्टर, स्मार्ट स्ट्रीट लाइट, स्मार्ट कार पार्किंग’ अशा अनेक प्रकल्पांचे रोल मॉडेल तयार करून दाखविले.

जे प्रकल्प अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदवीचे शिक्षण घेताना करावे लागतात, ते प्रकल्प इयत्ता ७ वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तीन दिवसाच्या प्रशिक्षणातच साकारले आहेत.

याप्रसंगी मुख्याध्यापक इंगळे, उपमुख्याध्यापक ठाकरे, पर्यवेक्षक शिरसाठ, उपशिक्षक आर. आर. अहिरे, एम. एस. चव्हाण, एन. एस. रावते, जे. आर. परदेशी, व्ही. एच. सुर्यवंशी तसेच प्रशिक्षक अश्विन रघुवंशी, दिपक अचलखांब, मुकेश देवांगण, शुभम शार्दुल, मानस देवांगण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या