Rohini Khadse : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची निवड; शरद पवारांच्या उपस्थितीत नियुक्ती

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

महिनाभरापूर्वी अजित पवारांसह (Ajit Pawar) काही नेत्यांनी राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडून पक्ष दोन गटात विभागला गेला. यानंतर काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांनी मुंबईत (Mumbai) मेळावा घेत मोठे शक्तीप्रदर्शन केले होते…

मोठी बातमी! मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन; सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या, नेमकं प्रकरण काय?

त्यानंतर दोन्ही गटाने राज्यातील विविध जिल्हा, तालुका, शहर पातळीवर फेरबदल करत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा धडाका सुरु केला होता. याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देखील दोन्ही गटांकडून नवीन नेमणूका करण्यात आल्या होत्या. तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

Maharashtra Government : राज्यातील दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कुणाचीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडीकडे लागल्या होत्या. यानंतर आता शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर बीडचे बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Sanjay Raut : …तर लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती

कोण आहेत रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे या माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना रोहीणी खडसे-खेवलकर या नावाने सुद्धा ओळखले जातात. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी २३ ऑक्टोंबर २०२० ला एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला ‘हा’ अंदाज, वाचा सविस्तर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *