Wednesday, April 24, 2024
HomeजळगावVideo स्मशानभूमी व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे

Video स्मशानभूमी व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे

मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील बहाळ येथे केंद्राची डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजना व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरु असलेली स्मशानभूमीचे सुशोभीकरण व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची सुरु आहेत. तसेच शेतकर्‍यांनी रस्त्यांच्या कामांसाठी जमा केलेली लोकवर्गींच्या खार्चातून देखील शासकिय निधी लाटल्याचा प्रकार समोर येत आहे. जवळपास तब्बल साडेचार कोंटीच्या कामात घोळ सुरु असून गावातील एक पुढार्‍यानेच पडद्या आड राहुन ठेकेदारांशी संगमत करुन हा निधी लाटत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होवून कामाचा दर्जा तपासण्याची मागणी ग्रामस्थ व ग्रा.प.सद्यांकडून केली जात आहे.

- Advertisement -

तालुक्यातील बहाळ गावाला ऐतिहासी व सांस्कृतीक प्रार्श्‍वभूमी आहे. येथे तब्बल ६० हजार ऋषीमूनीनी रामायण काळात तप केला होता. या ऋषींना भेटण्यासाठी राम, लक्ष्मण, सीता या देवतांनी येथे भेट दिल्याची पौर्णिक कथा आहे. त्यामुळे या भूमीला पवित्र तपोभूमी म्हटले जाते. परंतू या पवित्र भूमीला गेल्या अनेक वर्षांपासून काही भ्रष्ट्र पुढार्‍यांमुळे बदनामीची किट लागत आहे. गेल्या वर्षभरापासून गावात केंद्राची डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजना व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्मशान भूमीचे सुशोभीकरण व रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतू ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याची प्रकार समोर आला आहे. स्मशान भूमीच्या बैठक व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेल्या ओट्यामध्ये मुरमा ऐवजी अक्षरशा; माती भरण्यात आली आहे. तर स्मशनभूमीसह अनेक ठिकाणी जाणार्‍या रस्त्याची रुदी कमी करण्यात आली आहे. तब्बल साडेचार कोंटीची सुरु असलेली व झालेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. संबंधीत कामांची आज ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली असता, सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. त्यांनी लागलीच भ्रमणध्वनीवरुन गटविकास आधिकारी, जि.प.मुख्याधिकारी, मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर शासकिय यंत्रणेमार्फत त्वरित योग्य चौकशी न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचा देखील इशारा दिली आहे. याप्रसंगी जेष्ठ नागरिक सोपान महाजन, उपसरपंच प्रमोद पाटील, ग्रा.प.सदस्य केशरबाई माळी, गोपीचंद माळी, भैय्या महाजन, नितीन पगारे, रविंद्र बोरसे, विजय महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकवर्गींच्या खर्चातून शासकिय निधी लाटण्याचा प्रयत्न-
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने बहाळ येथून जाणारा दसकेबर्डी, भवाळी या रस्त्याच्या कामांसाठी शेतकर्‍यांनी लोकवर्गीतून लाखो रुपयांचा निधी जमा करुन, रस्त्यांची कामे या निधीतून करण्यात आली. मात्र नावात ‘ ब ’ आणि भ्रष्ट्रपवृत्ती असलेल्या एक पुढार्‍याने या रस्त्यांच्या कामांसाठी पुन्हा शासकिय निधीची तरतूद केली. आणि तब्बल २० ते २२ लाखांचा बिल काढल्याचे बोलले जात आहे. लोकवर्गींच्या माध्यमातून शासकिय निधी देखील लाटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या भ्रष्ट्रपवृत्तीच्या पुढार्‍याने ठेकेदारांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामात व स्मशानभूमीच्या कामात देखील मोठा निधी लाटला असून या ठेकेदारांमध्ये चाळीसगाव येथील एका नगरसेवकाचा नातेवाई असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या ठेकेदारावर आता ‘ खरीखुरी ’ कारवाई होवून त्यांना तात्काळा काळ्या यादीत टाकले पाहिजे. विशेष म्हणजे बहाळ शिवारातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात देखील या पुढार्‍याने मोठ्या प्रमाणात निधी लाटल्याचे बोलले जात आहे.

गावातील रस्त्यांची कामे व स्मशानभूमीच्या कामे हे निकृष्ट दर्जाची सुरु आहेत. तर इतर ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे देखील अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. यासंपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही चौकशीची मागणी केली आहे. त्वरित चौकशी न झाल्यास आम्ही उपोषणास बसणार आहोत.
सोपान नथ्थू महाजन, जेष्ठ नागरिक, बहाळ

- Advertisment -

ताज्या बातम्या