Friday, April 26, 2024
Homeनंदुरबाररेल्वे विभागाचे डीआरएम यांनी घेतला आढावा

रेल्वे विभागाचे डीआरएम यांनी घेतला आढावा

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या (Gandhidham-Puri Express) पेंट्रीकारला (pantry car) आग (Fire) लागल्याच्या घटनेनंतर रेल्वे विभागाचे डीआरएम जीव्हीएल सत्यप्रकाश (DRM GVL Satyaprakash) हे विशेष रेल्वेने सायंकाळच्या सुमारास मुंबईहून नंदुरबारात दाखल झाले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला असून चौकशीचे आदेश (Inquiry orders) दिले आहेत.

- Advertisement -

आज सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास गांधीधाम-पूरी या एक्सप्रेसच्या पेंट्रीकार अर्थात स्वयंपाकगृहाच्या बोगीला अचानक आग लागली. या आगीमुळे संपुर्ण बोगी जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत बोगीतील किराणा, भाजीपाला, फळे, तसेच इतर सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. दोन तासाच्या थरारानंतर आग आटोक्यात आली व रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, घटनेच्या पार्श्वभुमीवर रेल्वे विभागाचे मुंबई येथील डी.आर.एम. जीव्हीएल सत्यप्रकाश हे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विशेष रेल्वेने नंदुरबारात दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेचा आढावा घेतला असून आवश्यक त्या सुचना संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. घटनेची चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत डीआरएम नंदुरबारात होते. घटनास्थळी प्रांताधिकारी मिनल करनवाल, आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी आ.शिरीष चौधरी आदींनी भेट देवून पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या