Thursday, April 25, 2024
Homeनगरमहसूलच्या कारवाईला दिलीप गांधींचा आक्षेप

महसूलच्या कारवाईला दिलीप गांधींचा आक्षेप

अहमदनगर (प्रतिनिधी) – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्टर असलेल्या सुप्यातील मल्टीनॅशनल कंपनीवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईला माजी खासदार दिलीप गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. कारवाई करणार्‍या प्रांतांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सुपा एमआयडीसीत कॅरिअर मायडिया आणि मेंदो या दोन मल्टीनॅशनल कंपन्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आल्या. 1300 कोटींची गुंतवणूक या कंपनीकडून केली जाणार आहे. सुमारे 87 एकर जागेवर फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू आहे. कंपनीने सव्वापाच कोटी रुपयांची रॉयल्टी महसूलकडे भरली आहे. दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाने कंपनीत घुसून गौणखनिज कायद्यांन्वये कारवाई केली. त्यालाच दिलीप गांधी यांचा आक्षेप आहे. कुठलीही नोटीस न देता महसूलचे पथक थेट कंपनीत गेलेच कसे, असा सवाल करत अधिकार्‍यांना दमबाजी करत अडथळा आणला तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महसूल विभागाची ही अरेरावी असून त्यासंदर्भात कलेक्टरांकडे तक्रार केल्याचे गांधी यांनी सांगितले. या कंपनीमुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार असून, त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या