Friday, April 26, 2024
Homeनाशिकदहावीचे निकाल लागले आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा

दहावीचे निकाल लागले आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा

नाशिक | Nashik

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board) शाळा, कॉलेजला विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे (Evaluation marks) मार्क्स अपलोड करण्यासाठी २३ जुलै पर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे २४ जुलै नंतर कधीही बोर्डाकडून अंतिम निकाल ऑनलाईन (12th Result) जाहीर केला जाऊ शकतो.

- Advertisement -

महाराष्ट्रात करोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis) यंदा बोर्डाच्या परीक्षा रद्द (Board Exams Cancelled) झाल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाकडून १० वी, १२ वीचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने (Evaluation Criteria) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १६ जुलै दिवशी बोर्डाने १० वीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना १२ वीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

अद्याप महाराष्ट्र बोर्डाने १२ वी निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही पण १० वी प्रमाणेच १२ वीचे निकाल देखील यंदा ३१ जुलै पर्यंत लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्याबद्दलचे संकेत पूर्वी दिले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत कधीही १२वी निकालांची देखील घोषणा होऊ शकते.

यंदा बोर्डाचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावले जात असल्याने उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. १० वी निकालामध्ये याच गोष्टीमुळे ऑनलाईन निकाल जाहीर होताच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लॉग ईन झाले आणि बराच वेळ निकालाची वेबसाईट डाऊन असल्याचंही पहायला मिळालं होते. त्यामुळे त्यासाठीची तयारी करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून आता थोडा वेळ घेतला जाऊ शकतो.

मूल्यमापन निकष

दहावी प्रमाणे बारावीचा निकाल देखील यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावला जाणार आहे. यामध्ये ४०:३०:३० असा फॉर्म्युला सेट करण्यात आला आहे. बारावीच्या निकालासाठी यंदा १० वी, ११वी आणि १२ वी चे गुण ३०:३०:४० या फॉर्म्युलाने ग्राह्य धरले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या