Wednesday, April 24, 2024
Homeधुळेअ.भा. मराठी पत्रकार परिषदेवर गो.पि.लांडगे, डॉ. गोपी सोरडे यांची निवड

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेवर गो.पि.लांडगे, डॉ. गोपी सोरडे यांची निवड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धी प्रमुख नेमण्यात आली.

- Advertisement -

यात धुळे-नंदुबार जिल्ह्याची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे यांच्यावर तर जळगाव जिल्ह्यासाठी देशदूतचे डॉ.गोपी सोरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार आणि नाशिक विभागीय सचिव मन्सुरभाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी नाशिक विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची यादी आज जाहीर केली.

तसेच नाशिक जिल्ह्यासाठी पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ, जळगाव जिल्ह्यासाठी डॉ. गोपी सोरडे, अहमदनगर जिल्ह्यासाठी अमोल वैद्य (अकोले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. नवनियुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी कौतूक केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी यापूर्वी अ.भा. मराठी पत्रकार परिषद व धुळे जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्याने एकत्रित धुळे-नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, प्रांतिक प्रतिनिधी, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव या पदांसह पोस्टल फोरम अशासकीय सदस्य, विभागीय अधिस्विकृती समिती, महात्मा गांधी तंटामुक्ती व हगणदारी मुक्ती, राज्यस्तरीय मूल्यमापन समितीवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून अशासकीय सदस्य म्हणून काम केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या