Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआमदार धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा नोंदवा

आमदार धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा नोंदवा

औरंगाबाद – aurangabad

आष्टी पोलीस ठाण्यात (Ashti Police Thane) २४ जुलै २०२१ रोजी (bjp MLA Suresh Dhas) भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह 3७ समर्थकांनी प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. संदीपकुमार मोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार दरोड्याचे कलम समाविष्ट करण्यात आल्याची माहिती बीड (police) पोलीस विभागातील (lcb) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.

- Advertisement -

खंडपीठात अँड. एस. व्ही. दीक्षित यांच्यामार्फत माधुरी मनोज चौधरी यांनी याचिका दाखल केली. त्या फिर्यादीनुसार माधुरी यांचे पती मनोज यांना आ. धस हे राजकीय प्रतिस्पर्धी समजून द्वेषाची वागणूक देतात. धस यांच्याविरुद्ध मुर्शदपूर गटातून मनोज यांनी निवडणूकही लढवली आहे. त्यांच्याविरुद्ध धस हे खोट्या तक्रारी करतात. सिंचन व महसूल विभागाशी संगनमत करून गट क्र. ५९७ मधील नऊ गुंठे जमीन कमी केली. तसेच अतिक्रमण केल्याचाही ठपका कुटुंबावर ठेवला.

त्यांच्या जमिनीवरील संरक्षक भिंत. जेसीबी लावून जमीनदोस्त करण्यात आली. यादरम्यान घटनास्थळी आपल्यासह पती, मुले, सासऱ्यांवर दगडाने हल्लाकेला. धस यांच्या समर्थकांकडे काठ्या, तलवारी होत्या. जिवे मारण्याचाच प्रयत्न होत असल्याचे पाहून कुटुंबीयांसह आम्ही सर्व पोलीस ठाण्यात धावलो. या प्रकरणात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. मात्र, धस यांच्याविरोधात दरोड्याचाही गुन्हा दाखल करण्यासाठी माधुरी चौधरी यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली. खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या विनंतीनुसार दरोड्याचे ३९५ हे समाविष्ट करावे, असे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या