Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशReliance Retail ने 'अर्बन लॅडर'चा 96 टक्के हिस्सा घेतला विकत !

Reliance Retail ने ‘अर्बन लॅडर’चा 96 टक्के हिस्सा घेतला विकत !

मुंबई l Mumbai

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance Industries Limited – RIL) सबसिडरी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (Reliance Retail Ventures Limited – RRVL) या कंपनीने अर्बन लॅडरचे (Urban Ladder) 96 मालकी हक्क खरेदी केले. व्यवहार पूर्ण करण्यासाठी रिलायन्स रिटेलने 182.12कोटी रुपयांचा खर्च केला.

- Advertisement -

व्यवसाय विस्तारासाठी रिलायन्स रिटेल लवकरच अर्बन लॅडर कंपनीत ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलने अर्बन लॅडरसोबत केलेला खरेदी व्यवहार तसेच अर्बन लॅडर संदर्भातील गुंतवणूक योजनेची माहिती मुंबईच्या शेअर बाजाराला (BSE formerly Bombay Stock Exchange) कळवली आहे. अर्बन लॅडरमध्ये ७५ कोटींव्यतिरिक्त आणखी एक मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने २०२३च्या अखेरपर्यंत केली जाणार असल्याचे समजते.

भारतात अर्बन लॅडर कंपनीची सुरुवात १७ फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली. ही कंपनी घरगुती फर्निचर आणि घराच्या इंटेरिअरशी संबंधित वस्तूंची विक्री करते. डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन अर्बन लॅडर मोठ्या प्रमाणावर विक्री करते. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये कंपनीची स्टोअर आहेत.

अर्बन लॅडर कंपनीने २०१९-२० या आर्थिक वर्षात ४३४ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि ४९.४१ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. याआधी अर्बन लॅडर कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १५१.२२ कोटी रुपयांची उलाढाल केली होती. पण कंपनीला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ११८.६६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अर्बन लॅडरचे ९६ टक्के मालकी हक्क खरेदी केल्यामुळे रिलायन्स रिटेलला स्टोअर आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने व्यवसाय विस्तार करता येईल. तसेच देशातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. रिलायन्स रिटेलला व्यावसायिकदृष्ट्या मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

सध्या अर्बन लॅडर कंपनीची दिल्ली एनसीआर, पुणे, बंगळुरू आणि चेन्नईत स्टोअर आहेत. कंपनी स्टोअरची संख्या वाढवण्याची योजना आखत होती. मात्र रिलायन्स रिटेलने आकर्षक प्रस्ताव सादर केल्यामुळे नव्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय झाला. अर्बन लॅडर कंपनी २०२१ मध्ये बीएसईमध्ये नोंदणी करुन शेअर बाजारात उतरण्याची तयारी करत आहे.

याआधी रिलायन्स रिटेलने फ्युचर ग्रुप ताब्यात घेण्यासाठी २४ हजार ७१३ कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण केला. मात्र काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. फ्युचर ग्रुप व्यवस्थापनाने मालकी हक्क विकले तरी फ्युचर ग्रुपमध्ये असलेल्या अॅमेझॉनच्या मालकी हक्कांवरुन कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी रिलायन्सचे कायदेतज्ज्ञ काम करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या