Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारसर्व्हर बंद पडल्याने दस्त नोंदणी प्रक्रिया ठप्प

सर्व्हर बंद पडल्याने दस्त नोंदणी प्रक्रिया ठप्प

चिनोदा । वार्ताहर Nandurbar

नवरात्रौत्सव नुकताच पार पडला आता दिवाळीचा मुहुर्त तोंडावर असल्याने नोंदणी कार्यालयात सकाळपासून दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होती. बंद झालेले सर्व्हर सुरू होईल, या अपेक्षेने आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली…

- Advertisement -

सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रतीक्षा करून सर्वजण परत गेले. संगणक सर्व्हरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होती. परिणामी शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यातील सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना दस्त नोंदणी करावी लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. निबंधक कार्यालयामध्ये सदनिका, दुकाने, जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते.

मागील आठवड्याभरापासून नोंदणीकरिता कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून सायंकाळपावेतो बसवून ठेवले जात आहे. प्रशासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प नसल्यामुळे वयस्क व्यक्तींना असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो.

– गौतम जैन, व्यापारी, तळोदा

- Advertisment -

ताज्या बातम्या