Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरघोडेगावात लाल कांदा @ 4500

घोडेगावात लाल कांदा @ 4500

नेवासा (प्रतिनिधी)-

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या आवकेत 2 हजार गोण्या घट झाली.

- Advertisement -

गावराण कांद्याला भाव जास्तीत जास्त 4 हजारापर्यंत तर लाल कांद्याला 4500 रुपये प्रतिक्किंटल पर्यंत निघाले.

काल गावरान कांद्याची 37 हजार 197 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला 3500 ते 4000 रुपये, दोन नंबरला 2800 ते 3000 रुपये तर तीन नंबरला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2500 ते 2800 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

काल लाल कांद्याची एकूण 975 गोण्या आवक झाली. एक नंबरला 3500 ते 4500 रुपये, दोन नंबरला 3000 ते 3500 रुपये तर तीन नंबरला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या