Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाडेव्हिड वॉर्नरचा विक्रमांंचा पाऊस

डेव्हिड वॉर्नरचा विक्रमांंचा पाऊस

मेलबर्न । वृत्तसंस्था Melbourne

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner ) मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडला आहे. शंभरावा कसोटी सामना खेळणार्‍या डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या दुसर्‍या दिवशी द्विशतकी खेळी केली. वॉर्नरने 254 चेंडूत 200 धावा कुटल्या. यादरम्यान, त्याने 16 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 100व्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने केलेली ही द्विशतकी खेळी ऐतिहासिक ठरली.

- Advertisement -

100 व्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि जागतिक क्रिकेटमधील दुसरा खेळाडू ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करत 254 चेंडूत 200 धावा कुटल्या. मात्र डेव्हिड वॉर्नर 200 धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र तिसर्‍या दिवशी डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी उतरू शकतो.

मेलबर्न कसोटीच्या दुसर्‍या दिवशी फलंदाजीला सुरुवात केल्यावर डेव्हिड वॉर्नरने स्टिव्हन स्मिथच्या साथीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने शेवटचे शतक जानेवारी 2021 मध्ये फटकावले होते. त्यानंतर आज त्याने शतकांचा दुष्कार संपवताना द्विशतकी खेळी केली.

सचिनशी बरोबरी

या डावात शतक झळकावण्यासोबतच वॉर्नरने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.आता वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 45 शतके केली आहेत, सलामीवीर सचिनचीही तेवढीच शतके आहेत. या दोघांच्या पाठोपाठ ख्रिस गेल 42 शतकांसह आहे. वॉर्नरने 81वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावाही पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो आठवा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

वॉर्नरचे विक्रम

* 100 व्या कसोटीमध्ये द्विशतक

* बॉक्सिंग डे कसोटीमध्ये द्विशतक

* एमसीजीवर द्विशतक

* 100 व्या कसोटीत 200 धावा फकटावणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज

* 100 व्या कसोटीत द्विशतक फटकावणारा जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज

* कसोटी क्रिकेटमध्ये तिसरें द्विशतक

- Advertisment -

ताज्या बातम्या