Friday, April 26, 2024
Homeनाशिकविद्रोही संमेलन वैचारीक मेजवानीची पर्वणी

विद्रोही संमेलन वैचारीक मेजवानीची पर्वणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक (nashik) शहरात 15 वे संविधान सन्मानार्थ विद्रोही मराठी साहित्य संमेलन (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) केटीएचएमच्या प्रांगणात होत आहे. कला (Art), साहित्य (Literature), संस्कृती (Culture), भाषा (Language), राजकारण (Politics), समाजकारण, अर्थकारण अशा सगळ्या विषयांना स्पर्श करणार्‍या वैचारिक मेजवानीची विद्रोही मराठी साहित्य संमेलन ही पर्वणी असेल, असे संयोजकांंनी म्हटले आहे.

- Advertisement -

समाजातल्या सर्व थरातल्या घटकांचा यात समावेश आहे. भाषा, प्रांत, धर्म, जाती यांची सीमा न मांडता या संकल्पनांना भिडणारे हे संमेलन आहे. लहानथोर अबालवृद्ध यात सहभागी असावेत, असा आयोजकांचा हेतू आहे. म्हणून आपल्या शहरातील, परिसरातील, विद्यालयातील किंवा संपर्कातील बालमित्रांचा या संमेलनात सहभाग असावा. यासाठी बालमित्रांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांचा या संमेलनात रचनात्मक सहभाग वाढावा यास्तव स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी प्रत्येक विद्रोही साहित्य संमेलनात बालमंचाची स्थापना करण्यात आली आहे.

ज्यात विविध बालगीते, वेशभूषा, वक्तृत्वकला, बाल एकांकिका प्रबोधनपर गीते, पोवाडे, बाल जलसे इत्यादी सादर व्हावेत, अशी संकल्पना आहे. मुलांना विविध विचारसरणी, चळवळी, भारतीय स्वातंत्र्य आंदोलन (Indian independence movement), सुसंस्कृत व विकसित मानव समाजातील मानवी हक्क व नैतिक मूल्ये यांची माहिती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), क्रांतीवीर बिरसा मुंडा (Krantiveer Birsa Munda),

महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), फातिमा बी, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), क्रांतिसिंह नाना पाटील, शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख या महामानवांच्या विचारांचा परिचय व्हावा, त्याचप्रमाणे या सार्‍या घडामोडींकडे पाहण्याचा डोळसपणा यावा; सभाधीटपणा अंगी येऊन आपल्या विविध गुणांचा इष्ट दिशेने आविष्कार करता यावा, अशी योजना आहे.

बालमंच संयोजक मुख्यध्यापिका मीनाक्षी गायधनी, प्रा. डॉ. प्राजक्ता बस्ते, सुवर्णा देसले त्यांचे नियाजेन करत आहे. बालमंच कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 7 तसेच 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 कालावधीत रावसाहेब थोरात सभागृह येथे होईल. सर्वोत्कृष्ठ सादरीकरण मुख्य मंचावर 5 डिसेंबर रोजी 5:30 वा. केले जाईल, असे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले, अ‍ॅड मनीष बस्ते, प्रभाकर धात्रक, प्रल्हाद मिस्त्री, किशोर ढमाले यांनी कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या