Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबाररावलापाणी येथे आज शहिदांना सामूहिक श्रद्धांजली

रावलापाणी येथे आज शहिदांना सामूहिक श्रद्धांजली

मंगेश पाटील । बोरद

तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथे दि. 2 मार्च 1943 रोजी ब्रिटीशांनी गोळीबार केला होता. यात 15 आदिवासी मृत्यूमुखी पडले होते. तर 28 जण जखमी झाले होते. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शहिदांना दरवर्षी दि.2 मार्च रोजी सामूहिक श्रध्दांजलीचा कार्यक्रम आप धर्माचे अनुयांतर्फे आयोजन करण्यात येते. यावेळी असंख्य आदिवासी बांधव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी उपस्थित राहत असतात.

- Advertisement -

रावलापाणी हे स्थळ धार्मिक व सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील शहिदभुमी असे त्रिवेणी महत्व असणार आहे. 1937 ला गुलाम महाराजांनी आप धर्माची स्थापना केली. आप म्हणजे सर्व जनता असा उपदेश गुलाम महाराजांनी केला. आदिवासी बांधवांना त्यांनी दिलेले शिकवण त्यांची वंशजांनी चालूच ठेवली आहे. 19 जुलै 1938 रोजी गुलाम महाराजांचे देहावसन झाले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू संत रामदास महाराजान यांनी आप धर्माची धुरा सांभाळली.

आप धर्माची चळवळ प्रत्यक्षरित्या पाहण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री खेर, अबकारी मंत्री गिलडर, जिल्हाधिकारी असे अनेक मंडळी मोरवडला 22 ऑगस्ट 1938 येवून गेले. त्या दिवशी झालेल्या आरती पुजनास लाखो भाविकांची उपस्थिती असल्याची नोंद आहे. रामदास महाराजांनी संवाद प्रबोधानाचे कार्य सुरू ठेवले तर आदिवासी समाज शेतावर राबायला येणार नाही. मजूर मिळणार नाही व अन्य सहन न करता प्रतीउत्तर दिल. याची भिती ब्रिटीशांना होती.

अनेक आदिवासी बांधव व्यसनमुक्त होत होते. यामुळे इंग्रजांनी त्यांच्यात फोडाफोडीचे राजकारण केले. त्यांच्यात भांडण लावून कायदा व व्यवस्था बिघडत आहे. असे वातावरण निर्माण केले. पश्चिम खान्देशच्या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी कलम 46 (1) अन्वये दि.16 जुलै 1941 रोजी पहिली बंदी आणली. संत रामदास महाराज व त्यांचे अनुयायांनी शासनाचा या आदेशाला केराची टोपली दाखवली. 24 ऑक्टोंबर 1941 रोजी जावळी (गंगठा स्टेट) येथे दंगा झाला.

आप धर्मीयांवर अत्याचार झाले. जाळपोळ झाली. तरीही प्रस्तापित व इतरांचे मोठे शिष्टमंडळ यांनी प्रत्यक्ष भेटून आरतीवर बंदीची मागणी केली. 30 ऑक्टोंबर 1941 रोजी पश्चिम खान्देशच्या तत्कालीन जिल्हधिकारी यांनी मोरवड (रंजनपूर) येथे कलम 144 लावून पोलीस बंदोबस्तात आरतीवर सक्तीने बंदी आणली व नंतरचा काळात म्हणजे 23 एप्रिल 1942 रोजी संत रामदास महाराज यांच्यासह 30 अनुयायी यांना 2000 वर्षासाठी जिल्हातून हद्दपार केला.

दि.2 मार्च 1943 ला चलेजाव चळवळीचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या चळवळीत प.खान्देशचे आदिवासी बांधवांचा प्रत्यक्ष सहभाग व्हावा, यासाठी तत्कालीन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठक्कार यांनी आप चळवळीचे प्रमुख संत रामदास महाराज यांना दोन वर्षाची हद्दपार शिक्षा भोगत असतांना त्यांना चलेजाव चळवळीसाठी आवाहन केले.

आपली हद्दपारीचे मुदत संपली नसतांना चलेजाव चळवळीला आपल्या संघटन शक्तीमुळे मोठेबळ देण्याचा हेतूने क्रांतीकारकांचा पाठीशी भक्क उभे राहण्याचा हेतूने आप धर्माने तळोदा तालुक्यातील बन येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निझरा नदीच्या पात्रात मुक्कामाला असणार्‍या हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजावर जो समाज 4 मार्च 1943 रोजी महाशिवरात्री होती. त्या शिवरात्रीच्या आरती पुजनाचा कार्यक्रमाला पोहचण्यासाठी सकाळी मार्गक्रमण करीत असतांना 2 मार्च 1943 रोजी दहशत निर्माण व्हावी म्हणून अमानुष्य गोळीबार केला. जालीनवाला बागेची आठवण व्हावी, असा गोळीबार कॅप्टन डायर यांनी केला तर रावलापाणी येथे कॅप्टन डयुमन यांनी गोळीबार केला. त्यात 15 आदिवासी बांधव मृत्यूमुखी पडले तर 28 जण जखमी झाले.

गोळीबार होणार याची पुर्वकल्पना संत रामदास महाराज यांनी होती. त्यांनी तशी कल्पना भक्तजणांना दिली होती. मात्र भक्तांनी न डगमगता आप धर्माचा जयजयकार करीत पुढे निघाल्याची नोंद आहे. याठिकाणी 15 जण मृत्यू झाल्याची नोंद आहे. यावेळी 73 जणांना दोन वर्षासाठी पश्चिम खान्देशातून हद्दपार केले होते. या इंग्रज अधिकार्‍यांनी केलेला गोळीबार भयंकर आहे. आजही 80 वर्षानंतर याठिकाणी असलेला दमडावर त्याच्या खुना आहे. तेव्हा तळोदा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

स्वातंत्र्यासाठी शहिदांचे स्मारक व्हावे अशी आप परिवाराची इच्छा आहे. यामुळे सामाजाला प्रेरणा मिळेल. पुर्वजानांनी स्वातंत्र्यासाठी सहभाग दिला. हे आजचा तरूण पिढीला कळेल. दरवर्षी 2 मार्च रोजी आप धर्माचे अनुयायी याठिकाणी येवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतात. याठिकाणी नागरीकांनी मोठया संख्येने उपस्िित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या