Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळे, शिरपूरात आज रावण दहन

धुळे, शिरपूरात आज रावण दहन

धुळे Dhule । प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी (three and a half muhurtas) एक असलेल्या दसर्‍याच्या (Dasara) दिवशी धुळे शहरात दोन ठिकाणी तर शिरपूरात (Shirpur) रावण दहन (Ravana Dahan) करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कुमारनगरात रावण दहन- येथील पूज्य सिधी सेंट्रल पंचायततर्फे दि. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता स्वामी टेऊंराम हायस्कूलच्या मैदानावर रावणाच्या भव्य प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून सिंधी समाजातर्फे रावण दहनाचा कार्यक्रम होत आहे. सुमारे 35 फुट उंचीच्या रावणाची प्रतिकृती तयार केली आहे. रावण दहनाच्या अगोदर आतषबाजी करण्यात येणार आहे. ती खास आकर्षण आहे. परंपरेनुसार सिंधी समाजातील लहान मुलांचे मुंडन संस्कार त्याठिकाणी करण्यात येणार आहे. मान्यवरांसाठी मोठे स्टेज बनविण्यात आले आहे. स्वामी टेऊंराम हायस्कूलच्या दुसर्‍या मजल्यावर महिलांसाठी बघण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुनानक सोसायटीत रावण दहन – येथील साक्री रोडवर असलेल्या गुरुनानक सोसायटीत बहावलपुरी समाज आणि गुरुनानक मित्र मंडळाच्या माध्यमातून तब्बल 61 फुटी रावणाचे दहन उद्या रात्री 8 वाजता मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात येणार आहे.

गेल्या 40 वर्षांपासून समस्त बहावलपुरी समाज आणि गुरुनानक मित्र मंडळ हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यात येतो. साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीच्या प्रांगणात रावण दहन करण्यात येणार आहे.

शिरपूर येथे महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळातर्फे रावण दहन- शिरपूर शहरातील 27 वर्षांची परंपरा असलेल्या माळी गल्ली येथील महात्मा ज्योतिबा फुले नवयुवक मित्र मंडळातर्फे दसर्‍याच्या दिवशी श्री खंडेराव मंदिराजवळील अरुणावती नदीच्या पात्रात शनी मंदिर समोर चाळीस फूट उंच रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता रावण दहन कार्यक्रम संपन्न होत असून त्याआधी राम, लक्ष्मण, हनुमान वानरसेना यांची मिरवणूक दुपारी 4.30 वाजता माळी गल्लीतून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत माळी समाजाचे लेझीम पथक, बँड पथक, ढोल ताशे यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येईल.

40 फूट उंच असलेल्या या रावणाच्या प्रतिकृतीचे संगमनेर येथील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.

रावण दहन कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, बाबुलाल भिका महाजन, साहेबराव भिका महाजन यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.

रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नामदेव माळी, उपाध्यक्ष प्रमोद शांताराम माळी, सचिव चंद्रकांत वसंत माळी, कोषाध्यक्ष गजानन रतिलाल माळी, सहकोषाध्यक्ष संजय साखरलाल माळी, कार्याध्यक्ष अनिल सिताराम माळी, सहकार्याध्यक्ष रवींद्र मोहन माळी, कार्यकारिणी सदस्य सुरेश जगन्नाथ माळी, प्रेमराज विठ्ठल माळी, सुरेश मेघराज माळी, संतोष रूपचंद माळी, हिम्मत शामराव माळी, जितेंद्र गंगाधर माळी, कंचन मोतीलाल माळी, संजय बाबुलाल माळी, गोपाल मुरलीधर माळी, रवींद्र सुकलाल माळी आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या